भाजपा वेंगुर्ले तालुका कार्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त अभिवादन
वेंगुर्ले/ विवेक परब : त्रिवार असावा मानाचा मुजरा त्या मातेला जिने घडवला राजा रयतेचा रचली स्वराज्याची गाथा , दैवत असे ती राजमाता जिजाऊ , तसेच उठा जागे व्हा जोपर्यंत ध्येया पर्यंत पोहचत नाही तोपर्यंत थांबु नका असे संदेश देणारे युगपुरुष स्वामी विवेकानंद अशी विश्वात वेगळी ओळख असणारया या दोन महान व्यक्तींना जयंती निमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अॅड. सुषमा खानोलकर, उपनगराध्यक्षा कु शितल आंगचेकर, नगरसेविका श्रेया मयेकर, नगरसेवक प्रशांत आपटे, ता.का.का.सदस्य रविंद्र शिरसाठ, महिला मोर्चा च्या रसीका मठकर, आकांक्षा परब, केशव ठाकुर इत्यादी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)