ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
लाल परी पुन्हा जखमी

लाल परी पुन्हा जखमी

प्रकाशन: 12 Jan 2022 12:48 PM
वाचन संख्या 209

आठवड्यात दुसऱ्यांदा हल्ला

कणकवली / उमेश परब – कणकवली-कळसुली या एसटीवर आज सकाळी ७.४५ वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा अज्ञाताकडून दगडफेक केल्याची घटना घडली आहे. कणकवली आगारातून सकाळी ७.३० वाजता एमएच २० बीएल ४०८२ एसटी कळसुलीच्या दिशेने जात असताना हळवल इथे या एसटीवर अज्ञाताने समोरील काचेवर दगडफेक करत तो पसार झाल्याची घटना घडली. यावेळी तीन प्रवासी प्रवास करत होते. मात्र, यात कुठल्याही प्रवासी किंवा चालक-वाहकास दुखापत झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. या एसटीमध्ये चालक म्हणून एस. ए. चव्हाण आणि वाहक म्हणून आर. पी. लोकरे हे कार्यरत होते. घटनेनंतर यासंदर्भात कणकवली पोलिसात तक्रार नोंदविण्याची कार्यवाही सुरू करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी विनोद कांबळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी , संदीप भोसले, ए पी आय. शेखर शिंदे, कैलास इंफाळ आदींनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

Article image

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स