पळसंब येथे एकात्मिक बाल विकास अंतर्गत स्वस्थ बाल, बालिका स्पर्धा
आचरा/विवेक परब : आज सकाळी ग्रामपचायंत पळसंब येथे एकात्मिक बाल विकास अंतर्गत, स्वस्थ बाल, बालिका स्पर्धा घेण्यात आली, त्यावेळी पळसंब गावातील गावठण, टेंब, आपकरवाडी, त्रिबंक या अंगणवाडीतील मुले उपस्थित होती प्रत्येक मुलांचे वजन करणे, उंची मोजणे, तपासणी करुन आरोग्याविषयी माहिती देण्यात आली त्यामध्ये विजेते पुढिल प्रमाणे अनुक्रमे 3 ते6 वयोगट सुदृढ बालक प्रथम क्रमांक कु.ओम आप्पा पाडावे, द्वितीय कु. परिणीती निलेश सावंत, तृतीय कु, जीया सचिन वझे 1 ते 3सुदृढ बालक प्रथम कु. जिहान मुरारी परब द्वितीय कु. दुर्वा उमेश पाडावे, तृतिय कु .पार्थ अमित साईल असे क्रमांक आले. त्यावेळी सुदृढ मुलांना खाऊ / पुस्तक भेट देण्यात आली यावेळी सरपंच श्री. चंद्रकांत गोलतकर, ग्रामसेवक श्री. अमित काबंळी,आरोग्य सेवक श्री . गणेश यादव, आरोग्य सेविका डि .एच. पोवळे, अंगणवाडी सेविका निखिता पुजारे, संगीता पळसंबकर, सुचिता सावंत़, आशा सेविका तनुजा परब, मदतनीस परब, गोलतकर , पालक, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)