ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
'कुतूहल अवकाशाचे' कार्यक्रमात २१ शाळांचा सहभाग!

'कुतूहल अवकाशाचे' कार्यक्रमात २१ शाळांचा सहभाग!

प्रकाशन: 09 Jan 2022 08:06 PM
वाचन संख्या 287

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर:: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांत, सिंधुदुर्ग जिल्हा शाखा, फिरती विज्ञान प्रयोगशाळा प्रकल्प, देवगड या सेवाभावी संस्थेच्या वतीने जामसंडे, पोंभुर्ले आणि पडेल कॅन्टीन येथे ‘कुतूहल अवकाशाचे’ हा कार्यक्रम मोठया उत्साहात पार पडला.
फिरती विज्ञान प्रयोगशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोण, जिज्ञासा वृत्ती आणि राष्ट्रभक्ती निर्माण व्हावी यासाठी दरवर्षी वेगवेगळे उपक्रम घेतले जातात.

याचाच एक भाग म्हणून या वर्षी तालुक्यातील पाच ठिकाणी दोन टप्प्यात अवकाश दर्शनाचे कार्यक्रम घेण्यात आले. पहिल्या टप्प्यात कुणकेश्वर आणि चांदोशी येथे असेच कार्यक्रम पार पडले. सदर कार्यक्रमांना २१ शाळांमधून २३० विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन टेलीस्कोपच्या माध्यमातून शुक्र, शनि, गुरु आणि चंद्र या ग्रहांचे निरीक्षण केले. त्याच बरोबर इतर तारकासमुह, नक्षत्रे, राशी, उपग्रह, दीर्घिका यांच्याबद्दल माहिती विद्यार्थ्यांनी जाणून घेतली.
सदर कार्यक्रमांमध्ये मार्गदर्शक म्हणून मालवण येथील मंदार गजानन माईणकर यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्री. मंदार माईनकर यांनी पौराणिक कथांचा वापर अवकाश समजून घेताना कसा करावा, याबद्दल प्रतिपादन केले.
या कार्यक्रमात जनकल्याण समितीचे कोकण विभाग प्रयोगशाळा विषयप्रमुख श्री. हेमंतजी आईर, सिंधुदुर्ग जिल्हा कार्यवाह श्री.जयेशजी खाडिलकर, प्रकल्प प्रमुख श्री.विवेक कुलकर्णी, सहप्रमुख श्री.चेतन पुजारे, प्रकल्पाचे पालक श्री. आनंद राजम, कार्यक्रम प्रमुख श्री. निलेश तिर्लोटकर, प्रकल्प समिती सदस्य श्री. जगदीश गोगटे, श्रीम. प्रतीक्षा जाधव, श्री. धर्मराज धुरत, श्री. योगेश पाटील, प्रकल्प शिक्षक श्री. भगिरथ राणे त्याचबरोबर शिक्षक, पालक, ग्रामस्थ ही उपस्थित होते.

Article image

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स