आता कणकवली विधानसभा क्षेत्रात 'घर तिथे युवा सैनिक' अभियान राबवणार...!
युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांचा संकल्प
आचरा/विवेक परब : सिंधुदुर्ग युवासेना जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती झाल्याबद्दल श्री सुशांत श्रीधर नाईक यांचा युवा सेने कणकवली तालुक्याच्या वतीने आज विजय भवन येथे सत्कार करण्यात आला. यावेळी कणकवली तालुका युवासेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नूतन युवासेना जिल्हाप्रमुख श्री सुशांत नाईक यांच्या उपस्थितीत बैठक देखील संपन्न झाली.
”कणकवली विधानसभा मतदार संघ युवासेनेची मला वरिष्ठांनी दिलेली जबाबदारी यशस्वी पणे पार पाडून युवासेना वाढीसाठी तसेच युवकांच्या ज्या काही समस्या असतील त्या शिवसेनेच्या माध्यमातून प्राधान्याने सोडवल्या जातील तसेच ‘घर तिथे युवा सैनिक’, हे अभियान देखील राबवण्यात येणार आहे. असे प्रतिपादन श्री सुशांत नाईक यांनी उपस्थित युवासैनिकांना केले.
या बैठकीत सुशांत नाईक यांनी कणकवली तालुका युवासेना संघटनेचा आढावा घेतला. यावेळी कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद निहाय युवासेनेच्या बैठकांचे नियोजन करण्यात आले. यावेळी श्री नाईक यांनी युवसेनीची कणकवली विधानसभेतील रिक्त पदे लवकरात लवकर भरण्याच्या सूचना उपस्थित पदाधिकाऱ्यांना करून बहुमूल्य असे मार्गदर्शन केले.”
यावेळी युवासेना माजी जिल्हाप्रमुख हर्षद गावडे, युवासेना समन्व्यक गितेश कडू , युवासेना तालुकाप्रमुख ललित घाडीगांवकर, गुरु पेडणेकर, धनंजय सावंत, सचिन पवार, नासिर खान, प्रकाश वाघेरकर, सुशांत मोहिते, प्रकाश मेस्र्ती, तेजस राणे, प्रतीक रासम, अमित मयेकर, रोहित राणे, भाई साटम , किरण वर्दम, निलेश परब, वैभव मालंडकर, भूषण कोळसुलकर, तेजस राऊत, केतन सावंत, चैतन्य सावंत,बंटी उरणकर,प्रमोद पिळणकर, कैलास घाडीगावकर, महेश राणे, शरद सरंगले, संतोष सावंत, बाबू घाडी, पराग म्हापसेकर, ओमकार सावंत, श्रीकृष्ण घाडीगावकर, कुणाल राणे, रोहित आरोंदेकर, अनादी साईल आदी युवासैनिक मोठ्या संखेने उपस्थितीत होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)