ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
कुडाळ नगरपंचायतचे उमेदवार श्री.सुधीर चव्हाण कालवश..!

कुडाळ नगरपंचायतचे उमेदवार श्री.सुधीर चव्हाण कालवश..!

प्रकाशन: 07 Jan 2022 11:03 AM
वाचन संख्या 384

मूळ मालवणच्या सुधीर चव्हाण यांच्या निधनाने जिल्हाभर होतोय शोक व्यक्त…!

मालवण | सहिष्णू पंडित : मूळ मालवण येथील आडवण भागातील श्री सुधीर अनंत चव्हाण (वय 39 वर्षे) यांचे काल रात्री साडेअकरा वाजता निधन झाले.
यंदाच्या कुडाळ निवडणुकीमध्ये ते भा.ज.पा.तर्फे प्रभाग सोळा मधून निवडणुकीच्या रिंगणात उभे होते.
रात्री एक स्थानिक प्रचार आटपून ते कुडाळ भाजप कार्यालय येथे पोहोचताच त्यांना अस्वस्थ वाटू लागले व हृदयविकाराचा तीव्र झटका आला. खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेले असता श्री सुधीर चव्हाण हे मृत असल्याचे घोषित केले गेले.
गेली पंधरा वर्षे विविध सामाजिक माध्यमांतून व खासकरुन मैदानी खेळांतून श्री.चव्हाण यांनी त्यांचा पाठिंबा व पुढाकार दाखवला होता.
स्वतःही उत्तम क्रिकेटर होते असलेल्या श्री.चव्हाण यांच्या जाण्याने मालवण,वायरी व आडवणसह संपूर्ण जिल्ह्यातील युवावर्गाला एक धक्काच बसला आहे. तत्वांसाठी आक्रमक परंतु समाज व मानवतेसाठी मदतशील अशी त्यांची ओळख खूप अल्पवयात निर्माण झाली होती.
श्री.चव्हाण यांनी त्यांची व्यावसायिक कारकिर्द श्री.डाॅक्टर निलेश बाणावलीकर हे मालवणमध्ये दंततज्ञ म्हणून कार्यरत असल्यापासून केली होती व आता कुडाळमध्ये आधुनिक व मोठ्या प्रमाणावर शास्त्रोक्त कृत्रिम दंत निर्मिती व्यवसायिक म्हणून सर्वांना परिचित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स