ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
कुडाळात रस्त्याच्या बाजूला एस. टी. बस कलंडली

कुडाळात रस्त्याच्या बाजूला एस. टी. बस कलंडली

प्रकाशन: 12 Aug 2021 01:37 PM
वाचन संख्या 63

कुडाळ | प्रतिनिधी :- सावंतवाडी वरून कणकवली ला जाणारी एस. टी. बस कुडाळ तालुक्यातील पंचायत समिती नजीकच्या रस्त्यावरील सखल भागात उलटली. ही घटना बुधवारी दुपारी १२:४० वाजण्याच्या सुमारास घडली. बस मध्ये अठरा प्रवासी प्रवास करत असून सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही.
बस चालक कांबळी यांच्या म्हणण्यानुसार, बसच्या समोरून जाणारी मोटरसायकल अचानक थांबली असता, बस ला ब्रेक मारल्याने ही घटना घडली. चालकाने प्रसंगावधान राखत बसवर नियंत्रण मिळवल्यानं सुदैवाने एवढ्यावरच निभावले.
सावंतवाडी आगाराची बस सावंतवाडी- कुडाळ- कणकवली अशी असून, चालक एम. एस. कांबळे व वाहक टी. एस. पवार त्यावर कार्यरत होते. बस कुडाळ मध्ये आल्यानंतर प्रवासी घेऊन ती बस पुढे मार्गस्थ झाली. कुडाळ येथील पंचायत समितीच्या वळणाच्या अलीकडे बस पुढे चालणाऱ्या मोटरसायकल स्वार अचानक थाबल्याने बसचालक कांबळे यांनी वाहानचालकाला वाचविण्यासाठी बसवर ताबा मिळवण्यासाठी ब्रेक लावला. मात्र त्यामुळे बस कलडून रस्त्याच्या सखल भागात अपघात झाला.
या घटनेने बस मधील पप्रवासी हादरून गेले. पण वाहक व चालक यांनी बसमधील प्रवाश्यांना धीर देत त्यांना सुखरूप बाहेर काढले. बस रस्त्याच्या सखल भागात तिथे कलडली तेथील लगतच्या घरापासून किंचित अंतरावर बस थाबल्याने अनर्थ टळला. अकरा केव्ही विद्युत वाहिन्या असलेल्या दोन खांबाच्या मध्ये बस स्थिरावली. बसचालकाच्या सतर्कतेने बसवर नियंत्रण राखण्यात यश मिळवले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स