२९ लाखांची मदत पूरग्रस्तांना प्राप्त
सिंधुदुर्ग | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात २१ ते २३ जुलै दरम्यान झालेल्या पुरामध्ये तब्बल ११४६ कुटुंबे बाधित झाली. शासनाकडून त्या कुटुंबांना २९ लाख http://localhost/news/public/uploads/20 हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले. प्रत्येकी साडेसात हजार रुपये मदत दिली जाईल, ही मदत जिल्ह्यात तातडीने वितरण करून बधितांना देण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी प्रशासनाला दिले आहेत.
दरम्यान, पुरामुळे ११८ हेक्टर जमीन वाहून गेली आहे. त्याचप्रमाणे व्यक्ती व जनावरे दगावल्याने सुमारे अडीच कोटी रुपयांचे नुकसान झाले असून त्याचा अहवाल शासनाला पाठविण्यात आला आहे.
संपूर्ण कोंकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली त्यामुळे पूर आला होता. त्यामुळे जीवित व वित्त हानी मोठ्या प्रमाणात झाली. त्यासाठी बाधित कुटुंबाना मदत देण्याकरिता २९ लाख २० हजार एवढे सानुग्रह अनुदान जिल्ह्याला प्राप्त झाले आहे. या अनुदानातून आणि प्रशासनकडील निधीतून प्रत्येक कुटुंबाला तातडीची ७ हजार ५०० रुपये मदत वेळीच देण्यात यावी, अशीही सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)