ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
सामाजिक वनीकरण कडून सायकल रॅलीचे आयोजन!

सामाजिक वनीकरण कडून सायकल रॅलीचे आयोजन!

प्रकाशन: 02 Jan 2022 01:52 PM
वाचन संख्या 65

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सामाजिक वनीकरण विभाग सिंधुदुर्ग वनपरिक्षेत्र कुडाळ यांच्या मार्फत आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रम अंतर्गत सायकल रँलीचे आयोजन कुडाळ येथे करण्यात आले. यावेळी विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण सिंधुदुर्ग श्री. सुभाष पुराणिक यांनी सिंधुदुर्ग सायकल असोसिएशन ग्रृप यांना निसर्गाबद्दल माहिती दिली.जैवविविधता तसेच नष्ट होत चाललेली औषधी वनस्पती याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.सायकल रँली घेऊन इंधन वाचवणे व पर्यायाने निसर्गाचे संवर्धन संरक्षण करणे हा एक उद्देश असलेबाबत माहिती दिली.सहभाग घेतलेल्या सायकल स्वारांना प्रमाणपत्र देवून सन्मानित करणेत आले.सदर कार्यक्रमास विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण विभाग सिंधुदुर्ग श्री. सुभाष पुराणिक, वनक्षेञपाल सामाजिक वनीकरण कुडाळ योगेश सातपुते, वनक्षेत्रपाल कुडाळ अमृत शिंदे, वनपाल सुनील सावंत व वनरक्षक रोहित मायणीकर, वनरक्षक सावळा कांबळे, तसेच डॉ. बापू परब, श्री. गजानन कांदळगावकर, श्री, रुपेश तेली, सिंधुदुर्ग सायकलिस्ट असोसिएशन आणि श्री. किशोर सरनौबत यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी जिल्ह्यातील सिंधुदुर्ग सायकल असोसिएशन ग्रृपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Article image

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स