ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
सरस्वती लक्ष्मण पवार राज्यस्तरीय पहिला काव्य पुरस्कार दिशा पिंकी शेख यांच्या "कुरूप" ला जाहीर
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

सरस्वती लक्ष्मण पवार राज्यस्तरीय पहिला काव्य पुरस्कार दिशा पिंकी शेख यांच्या "कुरूप" ला जाहीर

प्रकाशन: 01 Jan 2022 03:57 PM
वाचन संख्या 34

कणकवली / उमेश परब – सदाशिव पवार गुरुजी प्रतिष्ठान तर्फे यावर्षी पासून दिला जाणारा पहिला सरस्वती लक्ष्मण पवार काव्य पुरस्कार – http://localhost/news/public/uploads/2021 दिशा पिंकी शेख यांच्या कुरूप या काव्यसंग्रहास जाहीर झाला आहे. दिशा पिंकी शेख या श्रीरामपूर, अहमदनगर येथील असून साहित्य, सामाजिक, राजकीय क्षेत्रात त्यांचं उल्लेखनीय योगदान आहे. कुरूप मधील काव्य हे दुःखाचे खरेखुरे हृदयद्रावक प्रकटीकरण आहे. तृतीयपंथी किंवा हिजडा हे समाजाचेच घटक असूनही ते नेहमीच दुर्लक्षित आणि वंचित राहिले आहेत. त्यांच्या जगण्याचं वास्तव प्रतिबिंब ज्यात उमटलं आहे अशा कुरूप ला हा पुरस्कार जाहीर करून तृतीयपंथीयांना समाजात माणूस म्हणून चांगली वागणूक मिळावी आणि त्यांच्या समस्या सोडवण्यावर भर द्यावा हा सदाशिव पवार स्मृती प्रतिष्ठान चा उद्देश आहे, असा मनोदय प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ श्री सतीश पवार यांनी व्यक्त केला.

रोख रक्कम रु. 10000 आणि स्मृतिचिन्ह अशा स्वरूपाचा हा पुरस्कार दि. 1 मार्च http://localhost/news/public/uploads/2022 रोजी सदाशिव पवार गुरुजी यांच्या जयंतीदिनी उचल्याकार – लक्ष्मण गायकवाड यांच्या हस्ते आणि समाजसेवक श्री संदीप परब , लेखिका वैशाली पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीत कणकवली येथे समारंभ पुर्वक प्रदान करण्यात येणार आहे.

या पुरस्कार निवडी साठी डॉ. भा. वा. आठवले, वैशाली पंडित, डॉ. मिलिंद शेजवळ, प्रसाद कुलकर्णी आणि विजय शेट्टी या मान्यवरांचा सल्ला घेण्यात आला.

Article image

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स