राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी शिवराज सावंत यांची निवड
सचिवपदी संदिप शिंदे तर राज्य कार्याध्यक्ष दशरथ शिंगारे.
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर: राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य शाखा सिंधुदुर्गची कार्यकारीणी राज्याध्यक्ष सुभाष जिरवणकर यांनी नुकतीच पुणे येथे जाहीर केली.जिल्हाध्यक्षपदी राज्यपुरस्कार प्राप्त शिक्षक श्री.शिवराज विठ्ठल सावंत यांची तर जिल्हा सचिवपदी राज्यपुरस्कार प्राप्त शिक्षक श्री.संदिप बळवंत शिंदे यांची निवड करण्यात आली.तसेच राज्य कार्यकारीणीत राज्य कार्याध्यक्षपदी राज्यपुरस्कार प्राप्त शिक्षक श्री.दशरथ शिंगारे यांची निवड करण्यात आली. राष्ट्रीय राज्यपुरस्कार प्राप्त शिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री.सुभाष जिरवणकर यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे बैठक घेण्यात आली.यावेळी उर्वरीत जिल्हा कार्यकारीणी करण्याची जबाबदारी राज्याध्यक्ष यांनी जिल्हाध्यक्ष यांच्यावर सोपविली.मसुरे गावचे सुपुत्र असलेल्या शिवराज सावंत यांच्या निवडी बद्दल अभिनंदन होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)