ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
ऑमीक्रॉनचा प्रसार रोखण्यासाठी निर्बंध आणखी कडक.

ऑमीक्रॉनचा प्रसार रोखण्यासाठी निर्बंध आणखी कडक.

प्रकाशन: 31 Dec 2021 08:54 PM
वाचन संख्या 66

ओरोस / प्रतिनिधी : ओमीक्रॉनचा प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले असून लग्न समारंभ, इतर सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय किंवा धार्मिक कार्ये आणि मेळाव्यासाठी जास्तीत जास्त 50 व्यक्तींना परवानगी असेल. तर अंतिम संस्कारासाठी http://localhost/news/public/uploads/20 व्यक्तींना परगानगी असणार आहे, याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आज लागू केले.

या आदेशात म्हटले आहे, राज्यशासनाच्या महसूल व वन, आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभागाने 30 डिसेंबर रोजी दिलेल्या आदेशानुसार जिल्ह्यात कोविड-19 ओमिक्रॉन विषाणूचा फैलाव होण्यास प्रतिरोध (प्रतिबंध) करण्यासाठी नवीन निर्बंध संपूर्ण जिल्ह्यासाठी लागू केले आहेत. यामध्ये लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहामध्ये किंवा मोकळ्या जागेत जास्तीत जास्त ५० व्यक्तींना परवानगी असेल . तसेच इतर सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय किंवा धार्मिक कार्ये आणि मेळाव्याच्या बाबतीत, उपस्थितांची उपस्थिती बंदिस्त सभागृहासाठी किंवा मोकळ्या जागेत जास्तीत जास्त ५० व्यक्तीपुरती मर्यादित असेल. तर अंतिम संस्कारच्या बाबतीत जास्तीत जास्त २० व्यक्तींना परवानगी असणार आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण स्थानिक कोव्हीड-१९ ची साथरोग परिस्थिती विचारात घेवून संबधित शासकीय यंत्रणांशी विचार विनिमय करुन जिथे आवश्यक वाटेल तेथील निर्बंधांमध्ये वाढ करु शकेल. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, अस्थापना शासनाने यापूर्वी लागू केल्यानुसार दंडात्मक कारवाईस पात्र राहील.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स