ताज्या बातम्या
कांदळगावात आमदार निलेश राणे यांच्या विकासकामांच्या झंझावाताने प्रेरित होत अनेकांचा शिवसेना पक्षप्रवेश. पाझर तलाव वाचविण्यासाठी पिंगुळी ग्रामस्थांनी जाहीर केलेल्या उपोषणाला महाविकास आघाडीचा पाठिंबा. परमपूज्य सद्गुरू सदानंद माऊली महाराज यांचा १ नोव्हेंबर रोजी १४ वा पुण्यस्मरण दिन सोहळा. केरळच्या मुलींची महाराष्ट्रावर मात तर तेलंगणाचा उत्तर प्रदेशवर अतिरिक्त वेळेत निसटता विजय. पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...!
असलदे रामेश्वर विकास सोसायटी चेअरमन पत्रकार भगवान लोके बिनविरोध…..
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

असलदे रामेश्वर विकास सोसायटी चेअरमन पत्रकार भगवान लोके बिनविरोध…..

प्रकाशन: 27 Dec 2021 09:29 PM
वाचन संख्या 96

व्हाईस चेअरमनपदी दयानंद हडकर यांची निवड;पक्षविरहित सहकार विकास पॅनेल म्हणून काम करणार..

कणकवली / उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ):

श्री. रामेश्वर विविध कार्यकारी सेवा सोसायटी लि. असलदे या संस्थेचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.त्यानुसार गावातील सर्वच राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत ही निवडणूक बिनविरोध करण्याचा एकमुखी निर्णय घेतला.त्यानुसार १३ जागांसाठी १३ संचालक बिनविरोध झाले होते. असलदे रामेश्वर विकास सोसायटी चेअरमन पत्रकार भगवान लोके तर व्हाईस चेअरमनपदी दयानंद हडकर बिनविरोध सर्वानुमते करण्यात आली.पक्षविरहित सहकार विकास पॅनेल म्हणून हे संचालक मंडळ काम करणार असल्याचा विश्वास नूतन चेअरमन भगवान लोके यांनी दिला.

असलदे ग्रामपंचायत येथील रामेश्वर सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी एस.आर.मयेकर यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली.यावेळी संचालक दिनकर दळवी, विठ्ठल खरात, उदय परब, शामराव परब, संतोष परब, परशुराम परब , कांचन लोके, सुनिता नरे, शत्रुघ्न डामरे, अनंत सखाराम तांबे, प्रकाश विठू खरात आदी १३ संचालक उपस्थित होते. सर्वानुमते चेअरमन पत्रकार भगवान लोके तर व्हाईस चेअरमनपदी दयानंद हडकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने बिनविरोध निवड झाली.यावेळी नूतन चेअरमन, व्हाईस चेअरमन व माजी चेअरमन प्रकाश परब यांनी ३५ वर्षे संस्थेची यशस्वी जबाबदारी पार पाडल्याबद्दल गावाच्या वतीने शाल,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.निवडणूक बिनविरोध केल्याबद्दल सरपंच पंढरी वायंगणकर,लक्ष्मण लोके सर्व संचालक व जेष्ठ नागरिकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी असलदे सरपंच पंढरी वायंगणकर, सोसायटी माजी चेअरमन प्रकाश परब,तंटामुक्त समिती अध्यक्ष बाबाजी शिंदे
माजी सरपंच सुरेश लोके,लक्ष्मण लोके,तंटामुक्त समिती अध्यक्ष सचिव रघुनाथ लोके, विजय आचरेकर,विष्णू डगरे ,सचिन लोके,संतोष घाडी, विजय डामरे,पंकज आचरेकर, सचिन लोके,आत्माराम घाडी,चंद्रकांत जेठे,प्रशांत लोके,प्रदीप हरमलकर,संदेश आचरेकर,संजय जेठे, मनोज लोके, दयानंद डगरे,विष्णू डगरे, प्रकाश आचरेकर, अनिल लोके,कोतवाल मिलींद तांबे,रामचंद्र जेठे, गौरव लोके,यश जेठे आदींसह असलदे गावातील ग्रामस्थ व शेतकरी सभासद उपस्थित होते.सर्व उपस्थितांचे आभार सचिव अजय गोसावी यांनी मानले.शेतकरी सभासदांच्या हिताच्या योजना राबविणार-भगवान लोकेरामेश्वर विकास संस्थेच्या चेअरमनपदी मला बिनविरोध केल्याबद्दल सर्वांची मी ऋणी आहे.गावाने मला,तरुणांना मुख्य प्रवाहात आणून त्यांना रोजगार निर्मिती योजनांची अंमलबजावणी केली जाईल.शेतकरी गाव विकास पॅनेल हे राजकीय पक्ष विरहीत आहे.तो गावातील शेतकरी व नागरिकांचा विश्वास सार्थकी लावणार आहे.त्यासाठी लवकरच सभासद नोंदणी, योजनांची माहिती घेऊन वाडीवार भेटी घेणार असल्याची प्रतिक्रिया नवनिर्वाचित चेअरमन,पत्रकार भगवान लोके यांनी व्यक्त केला.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स