प्राथमिक शिक्षकांना जुनी पेंशन योजना लागू कराव्यात.
ओरस /प्रतिनिधी : १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत आलेल्या प्राथमिक शिक्षकांना जुनी पेंशन योजना लागू करावी आदी विविध मागण्यांसाठी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष राजाराम कविटकर, जिल्हा सरचिटणीस बाबाजी झेंडे कोषाध्यक्ष पुनम पालय, प्रशांत पारकर, प्रतीक्षा तावडे, आदीसह शिक्षक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी १ नोव्हेंबर २००५ नंतरच्या सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करुन खंड दोन प्रकाशित करावा, जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा बदली प्रक्रिया तात्काळ सुरु करण्यात यावी, शिक्षण विभागातील अधिकारी व शिक्षकांची सर्व रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावी, शिक्षकांना १०, २०, ३० वर्षानंतरची आश्वासित प्रगतीयोजना लागू करावी, संगणक परीक्षा उत्तीर्णतेला मुदतवाढ देण्यात यावी व वसुली थांबवण्यात यावी, केंद्रप्रमुख पदे १००% शिक्षकांमधून पदोन्नतीने भरण्यात यावे, निवासी व्यवस्था होत नाही तोपर्यंत मुख्यालयी राहण्याची अट रद्द करावी, प्रत्येक केंद्रशाळेस इंटरनेट सुविधा पुरवून केंद्रातील ऑनलाईन कामांसाठी डाटा एन्ट्री ऑपरेटर नेमणूक देण्यात यावी, जिल्हा परिषदेच्या सर्वच शाळामधील सर्व मुलांना विनाअट मोफत गणवेश योजनेचा लाभ दयावा, जिल्हा परिषदेच्या शाळांची विद्युत बिले भरण्यासाठी खास तरतूद करावी किंवा वीजबिले माफ करावीत, उन्हाळी सुट्टीत केलेल्या कोरोना ड्युटीऐवजी पर्यायी रजा देण्यात यावी, जिल्हा परिषदेच्या इयत्ता १ ली ते ७ वी च्या सर्व शाळांना उच्चश्रेणी मुख्याध्यापक पद मंजूर करावे आदी •मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)