ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मालवणचे माजी नगरसेवक रोही ऊर्फ रोहीदास मांजरेकर कालवश…!

मालवणचे माजी नगरसेवक रोही ऊर्फ रोहीदास मांजरेकर कालवश…!

प्रकाशन: 27 Dec 2021 07:39 PM
वाचन संख्या 236

अनेक आंदोलने, चळवळी आणि कार्यातील सक्रीय नांव हरपल्याची जनमानसांत भावना.!

मालवण | सहिष्णू पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातील माजी नगरसेवक रोही ऊर्फ रोहीदास मांजरेकर (वय,75 वर्षे ) यांचे आज सायंकाळी सात वाजता निधन झाले .
तत्कालीन ज्येष्ठ सुबोध आचरेकर, नवोदीत सुदेश आचरेकर, राजन सरमळकर तथा इतर अनेक नगरसेवकांसोबत एक आघाडीचे नांव असलेले श्री रोहीदास मांजरेकर हे एक अथक कार्यरत नगरसेवक व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाते.
मालवण शहर व मुंबईतील अनेक राजकीय घडामोडींत थेट कार्य सहभाग असलेले रोहीदास मांजरेकर हे मालवण रेवतळे मांजरेकर वाडा व संपूर्ण विभागातील एक आदरणीय व्यक्तिमत्त्व होते.
श्री मांजरेकर यांच्या जाण्याने सामान्य मालवणवासी व सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते यांच्यात शोकाचे वातावरण आहे. “रेवतळ्याचा रोही” अशी सामाजिक ओळख असलेल्या एका खंद्या राजकीय तज्ञाची कारकिर्द संपूर्ण तत्त्वनिष्ठ व साधेपणाने ओळखली जाते असेही मालवण वासियांचे मत आहे.त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा रुपेश व कन्या असा परिवार आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स