ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
एखाद्याच्या जीवापेक्षा कोणतीही निवडणुक महत्वाची नाही : आमदार वैभव नाईक..
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

एखाद्याच्या जीवापेक्षा कोणतीही निवडणुक महत्वाची नाही : आमदार वैभव नाईक..

प्रकाशन: 27 Dec 2021 12:40 PM
वाचन संख्या 74

संतोष परब यांच्यावरील हल्ल्यामागील मुख्य सुत्रधाराचे नाव उघड न केल्यास जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा

कणकवली / उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ ):कणकवली शहरात संतोष परब यांच्यावरील जीवघेण्या हल्ल्याला आठवडा उलटत आला तरी अद्यापही पोलीसांनी या हल्ल्यामागील मुख्य सूत्रधाराचे नाव जाहीर केलेले नाही. जिल्हा बँक निवडणुकीच्या तोंडावर कुणा केंद्रीय मंत्र्यांच्या दबावापोटी पोलीस मुख्य सुत्रधाराचे नाव जाहीर करण्यास टाळाटाळ करत असतील तर शिवसेना कदापि शांत बसणार नाही. संतोष परब हल्लाप्रकरणी पोलीस प्रशासन जिल्ह्यातील जनतेला आजपर्यंत केलेल्या कारवाईबाबत आवश्यक ती माहिती देण्यास का टाळाटाळ करीत आहे…? सिंधुदुर्ग जिल्ह्यात निवडणुकांच्या तोंडावर विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यावर हल्ला करणाऱ्या अपप्रवृत्ती कोण आहेत हे जिल्ह्यातील जनतेला समजलेच पाहिजे. पुढील दोन-तीन दिवसात संतोष परब यांच्यावरील हल्ल्याच्या मुख्य सूत्रधाराचे नाव पोलीसांनी उघड केले नाही तर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर शिवसेनेच्या वतीने मोर्चा काढण्यात येईल. पोलीसांनी कुणाच्याही दबावाला बळी पडता कामा नये. एखाद्याच्या जीवापेक्षा जिल्हा बँक किंवा कोणतीही निवडणुक महत्वाची नाही. त्यामुळे जिल्हा बँक निवडणुकीतील मतदानाचा विचार न करता पोलीसांनी हल्ल्यामागील मुख्य सूत्रधाराचे नाव आता जाहीर करायलाच हवे, असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी केले आहे.
संतोष परब हल्लाप्रकरणी घटनेदिवशीच पोलीसांनी चार हल्लेखोरांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी करून त्यांना अटक करण्यात आली. त्यांनी हल्ल्याची कबुली दिल्याचीही माहिती आहे. त्यानंतर आणखीन एका आरोपीला पोलीसांनी अटक केली. या सर्व आरोपींचे पुणे कनेक्शन उघड झाले आहे. जिल्ह्यातील कोणत्या नेत्याचे पुण्यात मॉल व बाकीचे व्यवसाय आहेत हे जिल्ह्यातील जनतेला माहिती आहे. आमदार नितेश राणे व जिल्हा परिषद माजी अध्यक्ष गोट्या सावंत यांना पोलीसांनी चौकशीची नोटीस पाठवली. आमदार नितेश राणेंनी वकीलांमार्फत पोलीसांना उत्तर पाठवल्याचे आणि पोलीस चौकशीला उपस्थित राहणार नसल्याचे मिडियासमोर जाहीर केले. तरी सुद्धा काल कणकवली पोलीस स्टेशनमध्ये आमदार नितेश राणे व गोट्या सावंत या दोघांचीही दोन-तीन तास कसुन चौकशी करण्यात आली. याचाच अर्थ पोलीसांनी संतोष परब हल्ला प्रकरणातील मुख्य सुत्रधार ओळखले आहेत. फक्त जिल्हा बँक निवडणुकीच्या तोंडावर हल्ल्याच्या मुख्य सूत्रधाराचे नाव उघड करण्यास पोलीस टाळाटाळ करीत आहेत. प्रस्तुत प्रकरणी पोलीसांनी केवळ चौकशीचा फार्स न करता आमदार नितेश राणे व गोट्या सावंत या दोघांनाही तात्काळ अटक करणे गरजेचे आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहकाराला सहकारमहर्षी शिवरामभाऊ जाधव, डी. बी. ढोलम, केशवराव राणे आणि भाईसाहेब सावंत यांच्यासारख्या पुण्यात्म्यांची दैदीप्यमान नेत्यांची परंपरा आहे. आमदार नितेश राणे ही वैभवशाली परंपरा खंडित करून जिल्ह्यातील सहकार क्षेत्र रक्तरंजित करू पाहत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहकार क्षेत्र नासवण्याचे त्यांचे नापाक मनसुबे कधीच सफल होणार नाहीत. काल नितेश राणेंनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार उद्धवजी ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला आहे. त्यासंदर्भात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा एकेरी भाषेत उल्लेख करून अवमान केल्याप्रकरणी मी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. यापुर्वी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा अवमान केल्यानंतर काय दुष्परिणाम होतात हे केंद्रीय मंत्री असलेल्या नारायण राणेंनी अनुभवलेले आहे. त्यानंतरही नितेश राणेंना फारशी उपरती झालेली दिसत नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करून अवमान केल्याप्रकरणी आमदार नितेश राणेंवर गुन्हा दाखल करून सिंधुदुर्ग पोलीसांनी पुढील कायदेशीर करावी आणि त्यांना चांगलीच अद्दल घडवावी. त्याशिवाय नितेश राणेंमध्ये सुधारणा होणार नाही.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स