ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मुणगे हायस्कुल येथे राष्ट्रीय गणित दिन साजरा!

मुणगे हायस्कुल येथे राष्ट्रीय गणित दिन साजरा!

प्रकाशन: 24 Dec 2021 12:51 PM
वाचन संख्या 82

विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : देवगड तालुक्यातील मुणगे येथील श्री भगवती हायस्कुल येथे राष्ट्रीय गणित दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत गणित संकल्पना आधारित रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा,प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती. रांगोळी स्पर्धेचे उदघाटन ज्यु कॉलेजचे शिक्षक प्रणय महाजन यानी केले. स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे आहे. रांगोळी स्पर्धा प्रथम तीन क्रमांक अनुक्रमे शर्वरी मुणगेकर, कृतिका बोरकर, रिया रासम. उत्तेजनार्थ प्रेक्षा सावंत. चित्रकला स्पर्धा- विवेक परब, अर्चिता कदम, वेैष्णवी रासम, उत्तेजनार्थ पार्थ गावडे.प्रश्नमंजुषा स्पर्धा- ( प्राथमिक गट) विदित रासम, दक्षेश मांजरेकर, व्दितीय जान्हवी मुणगेकर,रिया रासम, तृतीय अनुराधा कदम, रिया रासम. ( माध्यमिक गट) प्रथम ईशा प्रभु, सई राणे, व्दितीय विनया सावंत, गौरी सावंत, तृतीय रिया राणे, आदिती देवळी यानी यश प्राप्त केले. परीक्षण बाबाजी सावंत यानी केले. यावेळी प्र. मुख्याद्यापक प्रसाद बागवे, प्रणय महाजन, यानी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.थोर भारतीय गणिती तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जयंती राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जातो. रामानुजन याना बालपणापासूनच गणिताची आवड होती. अशी माहिती यावेळी गणित शिक्षक व प्र. मुख्याध्यापक प्रसाद बागवे यांनी दिली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.

Article image

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स