ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
डबलबारी भजनक्षेत्रातील लोकप्रिय असे  "कोकणरत्न" दीपक चव्हाण बुवा यांचे दुर्धर आजाराने निधन

डबलबारी भजनक्षेत्रातील लोकप्रिय असे "कोकणरत्न" दीपक चव्हाण बुवा यांचे दुर्धर आजाराने निधन

प्रकाशन: 24 Dec 2021 03:44 PM
वाचन संख्या 55

शिरगाव/ संतोष साळसकर :डबलबारी भजनक्षेत्रात अतिशय लोकप्रिय असलेले देवगड तालुक्यातील शिरगाव-आंबेखोल येथील सुपुत्र तसेच सुप्रसिद्ध भजनीबुवा कांशीराम परब यांचे शिष्य “कोकणरत्न” दीपक वसंत चव्हाण यांचे वयाच्या ५५ व्या वर्षी दुर्धर आजाराने आज २४ डिसें.रोजी स.९.३० वा. उपचारादरम्याने निधन झाले.त्यांच्या जाण्याने भजनक्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

त्यांना भजनाची लहानपणापासूनच आवड होती.लहानपणी त्यांनी शाळेत भजन सादर केले तेव्हा त्यांच्या अनभवणे सरांनी २ रु.बक्षीस देऊन तू पुढे मोठा भजनीबुवा होशील असा आशीर्वाद दिला.त्यानंतर त्यांनी मुंबईत येऊन बुवा काशीराम परब यांच्याकडे भजनकलेचे शिक्षण घेतले.आणि त्यांना शेवट पर्यंत आपले गुरू मानले.काही काळ त्यांनी मुंबई-भांडुप येथे संगीत विशारद श्री.सावंतगुरुजी यांच्याकडेही गायनाचे धडे घेतले.त्यांनी पहिली भजनाची डबलबारी १९९० साली मुंबई-शिवडी येथे बुवा प्रमोद हरयाण यांच्याबरोबर केली.पुढे ही जोडीने १८ वर्षे रसिकांची मने जिंकली.चालू घडामोडीवर बसल्या बसल्या गजर तयार करणे, वस्थुस्थितीला धरून शब्दफेक करणे यात त्यांचा कमालीचा हातखंडा होता.”जाऊ नको रे कोकन्या मुंबईला,मुंबई रव्हली नाही रे तुझी”हा त्यांचा गजर खूप अजरामर झाला आहे.त्यांना कोकणरत्न,महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा कलाभूषण,रायगडचा जीवनगौरव,लोकप्रिय भजनीबुवा असे विविध पुरस्कार मिळाले आहेत. अखिल महाराष्ट्र प्रासादिक भजन मंडळाचे ते उपाध्यक्ष होते.प्रभाकर तानाजी चव्हाण मित्रमंडळ मुंबईचे ते माजी अध्यक्ष होते.२६/११ च्या हल्ल्यात शूर जवानांसाठी त्यांनी “मुंबईचे या रक्षण करण्या दिली प्राणांची आहुतीर..शहीद जवानांनो शूरविरानु..”ही श्रद्धांजली खूप लोकप्रिय झाली.नागपूर,महाबळेश्वर येथेही त्यांच्या कलेचा मोठा गौरव करण्यात आला.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील शिरगावच्या या सुपुत्राने आपल्या गावचे नाव देशात अजरामर केले.भजनक्षेत्रात त्यांनी उतुंग भरारी घेतली तरी ते आपल्या गावाला कधीच विसरले नाहीत.मुंबई भांडुप-कोकणनगर ला त्यांचे वास्तव्य असले तरी ते न चुकता गावातील प्रत्येक धार्मिक कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहायचे.त्यांच्या पश्चात आई,पत्नी,एक मुलगा, दोन मुली, जावई, दोन भाऊ, दोन बहिणी,असा परिवार आहे.सर्वशिक्षा अभियान चे नारायण चव्हाण यांचे जेष्ठ बंधू तर जामसंडे हायस्कुलच्या शिक्षिका सौ.प्रज्ञा चव्हाण यांचे ते दीर होत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स