सुन रहा है ना तू…..(सिनेपट)
मनोरंजन विशेष: (टीम सिनेपट)
सहिष्णू पंडित(सहसंपादक) : चित्रपट ‘आशिकी 2’ हा http://localhost/news/public/uploads/2010 नंतरच्या दशकातील सर्वोत्कृष्ट संगितिकाच..!
संगीतकार जीत गांगुलीच्या जवळपास पंधरा वर्षे गंज लागलेल्या काही चाली दिग्दर्शक मोहीत सुरीला भावल्या…नुसत्या भावल्याच नाही तर त्या चालीवर ‘आशिकी 2’ वगैरे काढायची संकल्पना सुचली.
अंकित तिवारी,अरिजीत सिंग,श्रेया घोषाल वगैरेंनी गाणीही गायली परंतु या सिनेमाला हात लावायला कुठलाच तत्कालीन स्टार व हिराॅईन तयार होईना.
मूळ सिनेमा रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा असा आखलेला होता परंतु सर्व बट्ट्याबोळ..
हा सिनेमा नंतर रितेश देशमुख आणि लारा दत्ता असाही वळवायचा प्रयत्न झाला परंतु दोघांनीही सपशेल नकार दिला.
मोहीत सुरी जवळपास हा सिनेमा विसरुनच गेला होता जेंव्हा अर्चना पूरणसिंगने श्रद्धा कपूरची ओळख त्याला करुन दिली ..आणि त्याच काळात आर.जे…म्हणजे खराखुरा रेडिओ जाॅकी आदित्य राॅय कपूर मोहीतला एका मुलाखतीत भेटला .
मोहीत सुरीचा दिग्दर्शक पुनश्च जागा झाला आणि इतिहास बनला आशिकी 2″
सुन रहा है ना या दोन्ही व्हर्जनला कोणीही कोरिओग्राफर नाही ..कारण…अभिनय शिकवावा लागत नसतो ..जर तो येत असतो.
दोन्ही गाणी यु ट्यूब, एमेझाॅनवर उपलब्ध आहेत.
मराठमोळी श्रद्धा ऊर्फ आरोही आणि जीवनात हरलेला..पण आरोहीला जिंकवू पहाणारा राहुल जयकर…
जरुर पहा आशिकी 2…
खरं सांगतो त्या संगीतकार जीत गांगुलीचे नांव आजही आपण फारसे कोणी जाणत नाही…
पण संपूर्ण आशिकी 2 अल्बम म्हणून त्याचाच आहे.
सहिष्णू पंडित (सह संपादक)
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)