ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
सर्वसिद्ध धन्वंतरी….डाॅक्टर सिद्धेश सकपाळ..! (विशेष वृत्त)

सर्वसिद्ध धन्वंतरी….डाॅक्टर सिद्धेश सकपाळ..! (विशेष वृत्त)

प्रकाशन: 23 Dec 2021 08:55 AM
वाचन संख्या 187

आचरा | अनिकेत पांगे :(विशेष वृत्त) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरा परिसरात गेले काही महिने एक नांव समाजसेवेत,रुग्णसेवेत इतके वारंवार घेतले जाते की मुद्दाम थांबून त्यावर विचार करणे ही सर्वसामान्य माणूस तथा नागरिक म्हणून गरज पडते.
काय कोरोनाचा होता तरिही डाॅक्टर सिद्धेश सकपाळ हे नांव,काळ कोरोना नियंत्रणाचा तरिही तेच नांव, एखादी क्रिकेट स्पर्धा असो तेच नांव किंवा कुठलीही सांस्कृतिक आखणी असो तरिही तेच नांव…!
साधारण http://localhost/news/public/uploads/2000 ते http://localhost/news/public/uploads/2004 सालापर्यंत राहुल द्रविड जसा बॅटिंग, बोलिंग व क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाडीवर सर्वात जास्त भरोसेमंद नांव म्हणून आपल्याला आठवतं अगदी तसेच डाॅक्टर सिद्धेश सकपाळ हे आजकाल झालेले आहे.
मधुमेह तपासणी शिबीर असो अथवा चिंदर गांवचा एखादा सोहळा असो किंवा आचरा परिसरातील सामाजिक शुद्धतेचा सोहळा असो सिद्धेश सकपाळ हे नांव आदराने घेतले जाते…!
हा माणूस म्हणून कार्यरत असलेला सुंदर गळ्याचा डाॅक्टर नेमका कसा व किती गुणवत्तापूर्ण व्यकिमत्व आहे त्याची चर्चा सध्या नेहमीच रंगते आहे.
लवकरच हा माणुस आपल्या आपली सिंधुनगरी चॅनेल माध्यमातून आपल्यासमोर ‘सज्जांकित’ म्हणून येईल पण तोपर्यंत अशा व्यक्तिमत्त्वाचे मनापासून आपण अभिनंदन करुन शकतो…..
होय ना…!

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स