महाराष्ट्र राज्य प्रा. शिक्षक भारती राज्य संघटक किसन दुखंडे याना पितृशोक
मसुरे | प्रतिनिधी : मसुरे गडघेरावाडी येथील माजी सैनिक मोहन शंकर दुखंडे (९१ वर्ष ) यांचे अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, सुना, दोन भाऊ, पुतणे, पुतण्या, नातवंडे असा परिवार आहे. प्राथमिक शिक्षक भारती संघटना महाराष्ट्र राज्य संघटक व जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा सावडाव खलांत्रीचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक श्री. किसन दुखंडे, रिक्षा व्यावसाईक महेश दुखंडे व रविंद्र दुखंडे यांचे वडील तर राष्ट्रपती पदक विजेते निवृत्त पोलीस अधिकारी विजय दुखंडे यांचे भाऊ होत. मसुरे स्मशान भूमीत अंतिम संस्कार करण्यात आले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)