ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
"कानूनचे निवृत्त हातही " समाजबांधिलकीत सक्षम !
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

"कानूनचे निवृत्त हातही " समाजबांधिलकीत सक्षम !

प्रकाशन: 22 Dec 2021 12:06 PM
वाचन संख्या 179

विशेष वृत्त

निवृत्त पोलिस अधिकारी चंद्रकांत रासम यांनी व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून तुळसकर भावंडासाठी जपली सामाजिक बांधिलकी..!

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील तुळस येथील कु.विजय दिनेश तुळसकर व जागृती आणि कस्तुरी तुळसकर या तिन्ही भावंडांनी बुध्दीमत्ता, कला, संगीत, शिक्षण या सर्व कला बाल वयात आत्मसात केल्या आहेत.या मुलांचे पुढील आयुष्य समृद्ध घडविण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी देवगड तालुक्यातील मुणगे येथील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी चंद्रकांत भाऊ रासम यांनी व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून जमा केलेला २७ हजार रुपये रकमेचा धनादेश या भावंडांच्या घरी भेट देत सुपूर्द केला. मदतीचा हात पुढे करुन खारीचा वाटा ग्रुप मधील सर्व सदस्यांनी उचलल्या बद्दल रासम यांनी ग्रुप सदस्यांचे आभार मानले आहेत. मुलांचे वडील श्री दिनेश तुळसकर यांनी सुद्धा मदती बद्दल सर्वांचे आभार मानले आहेत. यावेळी निवृत्त पोलिस अधिकारी श्री चंद्रकांत रासम, निवृत्त पोलिस अधिकारी श्री दिपक राणे, अजित रासम,निलु महाजन, गणेश रासम आणि प्रकाश महाजन आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स