ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मी विजयासाठीच निवडणूक रिंगणात : सुशांत नाईक
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मी विजयासाठीच निवडणूक रिंगणात : सुशांत नाईक

प्रकाशन: 22 Dec 2021 12:13 PM
वाचन संख्या 88

महाविकास आघाडीचे सहकार समृद्धी पॅनलचे पतसंस्था मतदारसंघाचे उमेदवार सुशांत नाईक यांच्या प्रचाराचा शुभारंभ

कणकवली / उमेश परब ( सिंधुदुर्ग ब्युरोचीफ) : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महा विकास आघाडीचे सहकार समृद्धी पॅनलचे पतसंस्था मतदारसंघाचे उमेदवार सुशांत नाईक यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज कणकवलीत एसटी वर्कशॉप जवळील गणपती मंदिराजवळ करण्यात आला. त्यानंतर कणकवलीतील श्रीधर नाईक चौकात श्रीधर नाईक यांच्या पुतळ्यास अभिवादन करत त्यांचे आशीर्वाद घेण्यात आले. जिल्हा बँकेचे कणकवली विकास संस्था मतदारसंघाचे उमेदवार व माजी अध्यक्ष सतीश सावंत यांच्या हस्ते श्रीधर नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. माझ्यासमोर उमेदवार कोण आहे ते पाहण्यापेक्षा मी जिंकण्यासाठी निवडणुकीत उतरलो असे प्रतिपादन सुशांत नाईक यांनी याप्रसंगी केले. तर सहकार क्षेत्रात येऊ पाहत असलेला दहशतवाद मोडीत काढण्यासाठी आम्ही या निवडणुकीत महा विकास आघाडी पॅनल च्या माध्यमातून सामोरे जात असल्याचे सतीश सावंत यांनी सांगितले याप्रसंगी राष्ट्रवादीचे नेते नगरसेवक अबिद नाईक, नगरसेवक कन्हैया पारकर, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, नगरसेविका मानसी मुंज, बाळू मेस्त्री, आबा दुखंडे, विनोद मर्गज, शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले, तेजस राणे, रुपेश आंमडोसकर, प्रशांत वनस्कर, दिलीप वरने, राजू राठोड, गणेश चौगुले, बाबू सावंत, संजय पारकर, भास्कर राणे, प्रतिक्षा साटम, बंडू ठाकूर, गोट्या कोळसुलकर, प्रसाद अंधारी, निसार शेख, अमित केतकर, सुशांत दळवी, प्रदीप सावंत, संकेत नाईक, बंडू नाईक आदी उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स