ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
कळसुली, हळवल, लोरे न.१ गावात पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान;

कळसुली, हळवल, लोरे न.१ गावात पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान;

प्रकाशन: 20 Dec 2021 05:01 PM
वाचन संख्या 59

निवडणूक अधिकारी आर.जे.पवार यांची माहिती

कणकवली / उमेश परब – कणकवली तालुक्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणुकिसाठी मतदान उद्या दि.२१ डिसेंबरला होणार आहे.कळसुली,हळवल,लोरे नंबर १ या गावातील प्रत्येकी १ प्रभागासाठी मतदान होणार असून निवडणूक केंद्राध्यक्षांसह सर्व कर्मचारी ईव्हीएम मशीन व साहित्य घेऊन आज रवाना झाले आहेत, अशी माहिती कणकवली तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी आर.जे.पवार यांनी दिली.कळसुली गावातील जिल्हा परिषद शाळा हुंबरणे , हळवल केंद्र शाळा न.१,लोरे नंबर १ प्राथमिक शाळा नरामवाडी या मतदान केंद्रांवर ग्रामपंचायत पोट निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष, सहाय्यक मतदान अधिकारी, मतदान कर्मचारी, पोलीस व व्यवस्थापक म्हणून तलाठी व पोलीस पाटील उपस्थित राहणार आहेत. तसेच सदर केंद्रांवर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित राहतील.सदर मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी दुसऱ्या ईव्हीएम मशीनची व्यवस्था ठेवण्यात आलेले आहे.सर्व निवडणूक प्रक्रियेवर नियंत्रण झोनल ऑफिसर ठेवणार आहेत.सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५.३० या वेळेत सदर प्रभागातील मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन आर.जे .पवार यांनी केले आहे.सर्व ईव्हीएम मशीनची रंगीत तालीम आज होईल . मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तसेच तालुक्‍यातील ज्या ग्रामपंचायत पोटनिवडणुका इतर मागास प्रवर्ग आरक्षणाच्या होत्या , त्या १२ जागा सर्वसाधारण प्रवर्ग म्हणून निवडणुक अधिसूचना आज काढण्यात येणार आहे.त्याठिकाणी मतदान १८ जानेवारीला मतदान होईल. त्यानंतर निवडणुकांचे एकत्रित निकाल १९ जानेवारी २०२२ रोजी जाहीर करण्यात येणार असल्याचे आर.जे.पवार यांनी सांगितले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स