हडी जेष्ठ नागरिक संघाचा २६ डिसेंबर रोजी वर्धापन दिन
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : मालवण तालुक्यातील हडी येथील फेस्कॉम संलग्न जेष्ठ नागरिक सेवा संघाचा वर्धापन दिन २६ डिसेंबर रोजी विविध उपक्रमांनी हडी जठारवाडी शाळा येथे सकाळी ९ ते २.३० या वेळेत साजरा करण्यात येणार आहे. राष्ट्रीय हेल्प लाईन प्रतिनिधी प्रथमेश सावंत , कांदळगाव सरपंच सौ उमदी परब, विवेकानंद नेत्रालय चे संदीप कदम उपस्थित राहणार आहेत. सकाळी ९.३० ते १० दिपप्रजवलन , मान्यवरांचे सत्कार , १०.३० ते १२.३० मोफत नेत्र चिकित्सा शिबिर , प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन आदी कार्यक्रम होणार आहेत. उपस्थितीचे आवाहन जेष्ठ नागरिक संघ हडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)