शहरात विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई
कणकवली / उमेश परब : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कणकवली शहरात विनाकारण फिरणाऱ्यांवर अचानक बुधवारी सायंकाळी ५ वाजल्यानंतर नाकाबंदी करत पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.
पोलिस निरीक्षक अजमुद्दिन मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सुरू होती. यात शहरातील आप्पा साहेब पटवर्धन चौक , नरडवे नाका , व जानवली पुला जवळ पोलिसांकडून मास्क न लावणाऱ्यांवर व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावरही कारवाई करण्यात आली आहे.
यावेळी वाहतूक पोलीस चंद्रकांत माने , संदेश आबिटकर , प्रकाश गवस , आदींसह महिला पोलीस उपनिरीक्षक धनश्री पाटील , पोलीस हवालदार ममता जाधव , सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापू खरात , पोलीस नाईक रुपेश गुरव व इतर कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते. दरम्यान अचानक कारवाईचे सत्र सुरू केल्यामुळे अनेकांची धावपळ उडाली होती.विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)