हडपीड स्वामी समर्थ मठात दत्तजयंती सोहळा उत्साहात
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचालीत श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड येथे श्री दत्त जयंती उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.सकाळी गणेश पूजा, पादुकापूजन, अभिषेक व होमहवन, स्वामी समर्थ महाराजांच्या १११ मूर्तीवर ११११ वेळा नाम घोष व दुग्धाभिषेक स्वामी भक्तांच्या हस्ते करण्यात आला. मठाच्या सभोवताली पालखी सोहळा, महाआरती, महाप्रसाद, दुपारी ३ नंतर विविध भक्तिमय कार्यक्रम झाले. संस्थापक सचिव श्री.नंदकुमार तुकाराम पेडणेकर यांच्या संकल्पनेतून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या १११ लघुमुर्तीवर अभिषेक करण्याचा संकल्प करण्यात आला होता.त्या संकल्पाला स्वामी भक्तांनी प्रचंड प्रतिसाद दिला.श्री स्वामी समर्थ महाराजांच्या १११ लघुमुर्तीवर १११ स्वामी भक्तांनी अभिषेक करण्याच्या सन्मान मिळविला.श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचालीत श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड व श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई मंडळ, आणि श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड गाव समिती तर्फे त्यां सर्व स्वामी भक्तांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत.सदर कार्यक्रमास साहीत्य पुरविणारे स्वामी भक्त सौ.शैला म. कुवर,सौ.साधना प्र कुलकर्णी,सौ.स्वप्नाली सु. राणे व श्री सतीश काशीराम पारकर यांचे मठा तर्फे आभार मानण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री स्वामी समर्थ भक्त परीवार जोगेश्वरी मुंबई संचलित श्री स्वामी समर्थ हडपीड मठाचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर राणे, संस्थापक सचिव नंदकुमार पेडणेकर व विश्वस्त ज्ञानेश्वर राऊत, कार्यकारी मंडळ मुंबई व गाव समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, सदस्यांनी सहकार्य केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)