ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
वृक्ष संवर्धनातून पर्यावरण संरक्षण!

वृक्ष संवर्धनातून पर्यावरण संरक्षण!

प्रकाशन: 19 Dec 2021 04:35 PM
वाचन संख्या 58

तहसीलदार अजय पाटणे यांचे प्रतिपादन वडाचापाट येथे उत्पन्न देणाऱ्या वृक्षांच्या रोपांचे वाटप

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : आज ग्लोबल वॉर्मिंगची समस्या जटिल बनत असल्याने वृक्ष संवर्धन ही काळाची गरज बनली आहे. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षाचे संगोपन करणे ही महत्त्वाची बाब असून गेली काही वर्षे वडाचापाट येथील श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल हे वडाचापाट गाव आणि पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना उत्पन्न देणाऱ्या वृक्षाचे वाटप करून एक स्तुत्य उपक्रम राबवित आहे. अशा प्रकारच्या उपक्रमातून या भागात रोजगारातून हरितक्रांती घडेल असा विश्वास मालवणचे तहसीलदार श्री. अजय पाटणे यांनी येथे बोलताना व्यक्त केला. वडाचापाट येथील श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल येथे महिंद्रा फायनान्स यांच्या सहयोगातून ग्रामस्थांना नारळ, काजू, जायफळ, मिरी या वृक्षांचे वाटप करण्यात आले. त्यावेळी तहसीलदार श्री. पाटणे हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून मुळदे येथील उद्यान विद्या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रदीप हळदवणेकर, भंडारी एज्यु. सोसायटी (मालवण) मुंबईचे ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर, संस्थेचे चेअरमन सुधीर हेरेकर, प्रशालेचे मुख्याध्यापक जे. एन. पाटील, भंडारी ए. सो. हायस्कूल चे मुख्याध्यापक व्ही. जी. खोत, माजी मुख्याध्यापिका सौ. सुप्रिया टिकम, श्री. आंगणे सर आदी व इतर उपस्थित होते. प्रारंभी जे. एन. पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. यावेळी बोलताना तहसीलदार अजय पाटणे यांनी पूर्वी शाळा शाळांमधून स्काऊट गाईडचे शिक्षण दिले जात होते त्यात खरी कमाई हा भाग होता. या खरी कमाईतून विद्यार्थ्यांना उपजीविकेचे साधन कसे निर्माण करायचे याचे जणू शिक्षण दिले जात होते. आज पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यावसायिक ज्ञान आवश्यक असून व्यावसायिक ज्ञानाचे धडे आय बी टी च्या माध्यमातून ही शाळा राबवत आहे. विद्यार्थ्यांना भविष्य काळात या व्यावसायिक शिक्षणाचा निश्चितपणे लाभ होईल असे ते म्हणाले. तर श्री. प्रदीप हळदवणेकर यांनी प्रगत कृषी ज्ञानाची माहिती देतानाच विद्यार्थ्यांना मार्केटिंगचे महत्त्व पटवून सांगितले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री विजय पाटकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले यावेळी संस्थेचे ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर, चेअरमन सुधीर हेरेकर यांची समयोचित भाषणे झाली. यावेळी मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. शेवटी वेदिका दळवी यांनी आभार मानले तर प्रसाद कुबल यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी सहाय्यक शिक्षिका प्रतिभा केळुसकर, पी पी सनये,भाऊ भोगले, कविता माडये, हर्षदा पाटकर , जगन्नाथ आंगणे, श्री महेश गावडे, शिपाई गुरुदास हडकर, वासंती वरक यांनी अथक परिश्रम घेतले

Article image

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स