ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कुडाळात उद्या शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची प्रचार सभा
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

कुडाळात उद्या शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची प्रचार सभा

प्रकाशन: 17 Dec 2021 07:54 PM
वाचन संख्या 80

कणकवली : उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ): कुडाळ नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रचार सभा शनिवार दि.18 डिसेंबर http://localhost/news/public/uploads/2021 रोजी सायं. 6 वाजता गांधीचौक येथील बसस्थानकाच्या पटांगणात आयोजित करण्यात आली आहे.यावेळी शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. उदय सामंत, माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, जिल्हा संपर्क प्रमुख अरूण दुधवडकर, शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर, शिवसेना महिला जिल्हा संघटक सौ.जान्हवी सावंत आदींसह आघाडीचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यावेळी सर्व कुडाळ शहरवासियांनी तसेच आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना तालुका प्रमुख राजन नाईक, शहर प्रमुख संतोष शिरसाट, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस भास्कर परब, प्रभारी तालुकाध्यक्ष शिवाजी घोगळे यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स