प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय नाथ पै एकांकिकांचा पुन्हा मिळणार नाट्यानुभव !
कणकवली /उमेश परब: वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान कणकवली आयोजित नाथ पै एकांकिका स्पर्धा २५ डिसेंबर ते २९ डिसेंबर दरम्यान होत आहे. ४४ वर्षे सलग होत असलेल्या नाथ पै एकांकिका स्पर्धेचा जिल्हावासीयांनी आनंद घ्यावा असे आवाहन वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान कणकवली यांच्या वतीने करण्यात आले आहे. गेली ४४ वर्षे नाट्यरसिक व नाट्य कलाकारांसाठी पर्वणी ठरत असलेली वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान कणकवली आयोजित नाथ पै एकांकिका स्पर्धा २५ डिसेंबर ते २९ डिसेंबर दरम्यान होत आहे. या स्पर्धेत राज्यातील नामवंत नाट्य संस्था सहभागी होणार आहेत. २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ७.०० वाजता पदमश्री परशुराम गंगावणे यांच्या शुभ हस्ते नाट्य स्पर्धेचा शुभारंभ होणार असून त्यानंतर शालेय गटातील स्पर्धा होणार आहे. शालेय गटात एकूण ४ नाट्य संस्था सहभागी झाल्या आहेत. तर खुल्या गटात सुमारे २७ नाट्य संस्था सहभागी झाल्या आहेत. रविवार दिनांक २६ डिसेंबर ते बुधवार दिनांक २९ डिसेंबर पर्यंत खुल्या गटातील स्पर्धा होणार आहे त्यानंतर पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होणार आहे. या नाट्य स्पर्धेच्या प्रवेशिका गुरुप्रसाद झेरॉक्स सेंटर घेवारी कॉम्प्लेक्स बाजारपेठ कणकवली येथे उपलब्ध असून जिल्ह्यातील नाट्य प्रेमींनी या स्पर्धेस उपस्थित राहावे असे आवाहन वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान कणकवली यांच्या वतीने करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)