ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
शिरगांव गावठण परिसरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट

शिरगांव गावठण परिसरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट

प्रकाशन: 16 Dec 2021 10:56 AM
वाचन संख्या 59

बाजारपेठेत भररस्त्यावर आडवे येत असल्यामुळे वाहनचालकांना धोकादायक

शिरगांव/संतोष साळसकर : देवगड तालुक्यातील शिरगाव बाजारपेठेत भटक्या कुत्र्यांचा खूपच वावर दिसून येत आहे. त्यामुळे वाहनचालक,पादचारी तसेच बाजारात येणाऱ्या ग्राहकांना याचा खूपच त्रास सहन करावा लागत आहे.
या भटक्या कुत्र्यांचा वावर हा खालची बाजारपेठ व वरच्या बाजारपेठेत या ठिकाणी कळपाने फिरताना दिसतो.वरच्या बाजरपेठेत बँक ऑफ इंडिया शाखेजवळ तर १० ते १२ कुत्र्यांचा कळप रस्त्यावर फिरताना दिसून येत आहे.बुधवार या बाजारादिवशी तर ग्राहकांना बाजारात फिरताना या कुत्र्यांचा खूपच त्रास होत असतो.रस्त्यावर मधेच हे कुत्रे आडवे येत असल्याने तसेच रस्त्यावर मधेच बसत असल्यामुळे वाहनचालकांना आपली वाहने चालविताना खूपच अडथळा जाणवतो.परिणामी अपघात घडण्याची शक्यता आहे. काही वेळा तर भरघाव वेगाने येणाऱ्या वाहनांच्या धडकेमुळे कुत्र्यांना आपला जीव गमवावा लागला आहे.तसेच गावठण परिसरात या कुत्र्यांनी अनेकांची कोंबडी खाऊन फस्त केली.त्यामुळे गावठी कोंबडी पाळणे लोकांना आता अशक्य झाले आहे.त्यामुळे या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त संबंधित शासकीय यंत्रणेने करावा अशी जोरदार मागणी होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स