ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
अर्जुन पुरस्कार प्राप्त सिंधू कन्या हिमानी परबचा मुंबईत सत्कार..!

अर्जुन पुरस्कार प्राप्त सिंधू कन्या हिमानी परबचा मुंबईत सत्कार..!

प्रकाशन: 16 Dec 2021 11:04 AM
वाचन संख्या 64

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : अर्जुन पुरस्कार प्राप्त सिंधूकन्या हिमानी परब हिचा दादर मुंबई येथे “तिमिरातुनी तेजाकडे” या शैक्षणिक तसेच सामाजिक चळवळीचे प्रणेते श्री. सत्यवान यशवंत रेडकर यांनी नुकताच सत्कार केला.
सिंधुदुर्गचे भूमिपुत्र, शासकीय कर्मचाऱ्यांचे गाव घडवण्यासाठी राबवित असलेल्या शैक्षणिक चळवळीचे प्रणेते वमुंबई सीमा शुल्क, भारत सरकार विभागात कनिष्ठ अनुवाद अधिकारी पदावर कार्यरत श्री. सत्यवान यशवंत रेडकर यांच्या सह श्रीकांत दगडू साळेकर, प्रशिक्षक उदय देशपांडे, सौ परब आदी उपस्थित होते. मल्लखांब या क्रीडा प्रकारात अर्जुन पुरस्कार प्राप्त, सिंधू कन्या कुमारी. हिमानी परब हिचा दादर येथील समर्थ व्यायाम शाळा येथे सदिच्छा भेट घेऊन सत्कार केला. हिमानी परब यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन त्यांच्याप्रमाणे कोकणातील इतर विद्यार्थ्यांनी विविध खेळ प्रकारात उत्तुंग यश संपादीत करावे व कोकणाचे तसेच महाराष्ट्राचे नाव जागतिक स्तरावर पुढे न्यावे असे श्री. सत्यवान रेडकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना संबोधित केले. उपस्थित अन्य खेळाडूंना शासनाच्या विविध खेळाडू कोट्याअंतर्गत असणाऱ्या विविध शासकीय नोकरी संदर्भातील संधींचा लाभ घेण्यात यावे असे आवाहन करण्यात आले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स