नारिंग्रे दत्त मंदिर येथे १८ डिसेंबर रोजी दत्त जयंती उत्सव.
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : देवगड तालुक्यातील नारिंग्रे येथे शनिवार १८ डिसेंबर रोजी जोगवलवाडी नारिंग्रे येथे श्री दत्त जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.गुरवार १६ रोजी दत्त भिक्षा कार्यक्रम, १८ रोजी
सकाळी ८ वाजता अभिषेक, सद्गुरू नामाचे हवन,महापूजा,दुपारी १२.३० नंतर महाप्रसाद,सायं ४.३० ते ६.३० कीर्तन व दत्तजन्म.
कीर्तनकार ह.भ.प. कमलाकर ( निलेश) विष्णू पाटकर( कोटकामते ) यांचे कीर्तन. दत्तपालखी सोहळा
रात्री भजने, रात्री १० वा – कालिदास सावंत लिखित तीन अंकी सामाजिक नाटक.
‘ अर्ध्यावरती डाव मोडीला ‘ होणार आहे.उपस्थितीचे आवाहन दत्त प्रसादिक मंडळ, नारिंग्रे यांनी केलं आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)