ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
पुढील कर्जासाठी केवळ ९ % व्याज

पुढील कर्जासाठी केवळ ९ % व्याज

प्रकाशन: 11 Aug 2021 05:28 PM
वाचन संख्या 64

खावटी कर्जमाफीसाठी अपात्र शेतकऱ्यांनी ऑगस्ट पर्यंत कर्जफेड केल्यास

जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांची माहिती

सोसायटिंकडून होमलोन घेतल्यास शेतकऱ्यांना १४ हजार ५०० रु. ची स्टॅम्प ड्युटी माफ

कणकवली / उमेश परब – कणकवली तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेंतर्गत सोसायटींच्या खावटी कर्जमाफीसाठी ७ हजार ६७३ शेतकरी पात्र असून १२ कोटी ७३ लाख रुपयांचे कर्जमाफ होणार असल्याची माहिती जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. १ ऑगस्ट २०१७ पासून 8 हजार 362 शेतकऱ्यांनी खावटी कर्ज घेतले. हे सर्व 8 हजार 362 हजार शेतकरी खावटी कर्जमाफीस पात्र नाही आहेत. मागील 3 वर्षांपासून हे कर्ज थकीत आहे. खावटी कर्जाचा व्याजदर हा 14 % आहे. जे शेतकरी ऑगस्ट http://localhost/news/public/uploads/2021 पर्यंत थकीत कर्ज फेडतील त्यांना नव्याने केवळ 9 टक्के दराने खावटी कर्ज मिळेल. यानुसार जिल्हा बँक शेतकऱ्यांना कर्जावर 5 टक्के सवलत देत असल्याची घोषणा जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी केली. यापुढे सहहिस्सेदारांची संमती नसली तरी शेती कर्जपासून वंचित शेतकऱ्यांना त्यांच्या वैयक्तिक मालमत्तेवर बोजा ठेवून कर्ज देण्यासंदर्भात विचार सुरू आहे. http://localhost/news/public/uploads/2018-19 आणि http://localhost/news/public/uploads/2019 -20 सालमधील शेतकऱ्यांच्या कर्जावरील मिळणारे 6 % व्याज अनुदान अद्याप मिळालेले नाही. ऑगस्ट महिन्यातील जिल्हा बँक संचालक मंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. गृहकर्ज बांधणी घेतलेल्या शेतकऱ्याला मॉर्गजसाठी 15 हजार खर्च येतो. यापुढे जिल्ह्यातील 216 सोसायट्यांकडून केवळ 500 रुपयांच्या बॉण्डवर 10 लाखांचे कर्ज उपलब्ध करण्यात आले आहे. 1 ऑगस्ट पासून याची जिल्ह्यात अंमलबजावणी झाली असून बँकेईतकेच 10 टक्के व्याजदराने 15 वर्ष मुदतीसाठी गृहकर्ज शेतकऱ्यांना दिले जात असल्याचे सावंत यांनी सांगितले. यावेळी जिल्हा बँक मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स