ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
आधी आपल्या पक्षातील सचिन वाझे शोधा - सतीश सावंत यांचे प्रत्युत्तर
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

आधी आपल्या पक्षातील सचिन वाझे शोधा - सतीश सावंत यांचे प्रत्युत्तर

प्रकाशन: 11 Aug 2021 04:37 PM
वाचन संख्या 67


कणकवली / उमेश परब : आमदार नितेश राणे यांचा दुसर्‍यावर आरोप करणे हा धंदा असल्याचे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी सांगत नितेश राणे यांनी प्रथम स्वतःचे घर आणि कार्यकर्ते सांभाळावे दुसऱ्यावर आरोप करू नयेत. कारण http://localhost/news/public/uploads/2019 मध्ये मी शिवसेनेत प्रवेश केला त्यावेळी माझ्या अनुभवा प्रमाणे कोणताही नवा -जुना असा कोणताही प्रकारचा वाद शिवसेनेत नाही, त्यामुळे आम.नितेश राणे यांनी शिवसेनेत भांडणे लावण्याचे काम करू नये. बाळासाहेब ठाकरे यांचा कडवट शिवसैनिक स्वतःला समजणाऱ्या नितेश राणे यांना स्वतःला शिवसैनिक म्हणून घेण्याचा नैतिक अधिकार नाही, कारण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असलेल्या उद्धव ठाकरे यांच्यावर आजपर्यंतचे नितेश राणे यांनी टीका केली आहे त्यामुळे त्यांनी हा अधिकार केव्हाच गमावला आहे अशी टीका करताना शिवसेनेवर टीका करण्यापेक्षा आम. नितेश राणे यांनी स्वतःच्या पक्षातील सचिन वाझे शोधावेत असा उपरोधिक टोला जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी आज पत्रकार परिषदेत केली. खासदार विनायक राऊत किंवा पालकमंत्री उदय सामंत आणि इतर सर्व पदाधिकारी हे एकत्र आहेत, त्यामुळे नितेश राणे यांनी त्यांच्यात भांडणे लावण्याचा प्रयत्न करू नये याचा कोणताही परिणाम शिवसेनेवर होणार नाही .किरण सामंत यांच्यावर केलेल्या आरोपांबाबत बोलताना सतीश सावंत म्हणाले, सन http://localhost/news/public/uploads/2014 च्या निवडणुकीनंतर आम. नितेश राणे यांच्या सोबत किती सचिन वाझे आले याचा विचार त्यांनी करावा ,आजही जिल्हा परिषद, नगरपंचायती या ठिकाणी आम. नितेश राणे यांच्यासाठी काम करणारे अनेक सचिन वाझे आहेत, त्यामुळे सचिन वाझे यांचे नाव घेऊन शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न नितेश राणे यांनी करू नये . जिल्हा परिषदेतील स्वतःचे सदस्य संभाळण्यासाठी नितेश राणे यांना पैसे द्यावे लागतात, यावरून त्यांची पक्षातील निष्ठा दिसून येत असून त्यांनी प्रथम स्वतःच्या पक्षाचा विचार करावा आणि नंतरच शिवसेनेवर टीका करावी असाही टोला सतीश सावंत यांनी लगावला आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स