हडपीड दत्तमंदिरात श्री दत्तजयंती उत्सव...!
सतरा डिसेंबर रोजी रात्री होणार पालखी प्रदक्षिणा
श्री.गुरुदेव दत्त सांप्रदायिक ट्रस्ट हडपीड यांचे आयोजन..
शिरगांव/संतोष साळसकर: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील हडपीड येथील श्री गुरुदेव दत्त सांप्रदायिक ट्रस्टच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे येथील श्री दत्त मंदिरात शनिवार दिनांक १८ डिसेंबर रोजी श्री दत्तजयंती उत्सव आयोजीत करण्यात आला आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून हा सात्विक धार्मिक उत्सव साजरा करण्यात येणार आहे.
यानिमित्त शुक्र.१७ डिसेंबर रोजी रात्री ८.३० वाजता पालखी प्रदक्षिणा,९.३० वा. महाप्रसाद,शनिवारी १८ डिसेंबर रोजी स.७ वा. नित्यपूजा,८ वा. आरती,९ वा. अभिषेक व घटस्थापना,दु.१२ वा. श्री दत्तजन्म सोहळा,महाआरती,१ वा. महाप्रसाद,सायं.७.३० वा. आरती, रात्रौ.८. वा.पालखी प्रदक्षिणा,९.३० वा. महाप्रसाद,१० वा. सात्विक भजने आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
तरी या उत्सवाला सर्व ग्रामस्थांनी,भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री.गुरुदेव दत्त सांप्रदायिक ट्रस्ट हडपीड चे विश्वस्त रवींद्र कदम,दत्ताराम अमृते संतोष राणे यांनी केले आहे.
******************
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)