ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
आज शिरगांव-पाडागरवाडी येथील जागृत श्री गिरावळ देवीचा डाळाप उत्सव

आज शिरगांव-पाडागरवाडी येथील जागृत श्री गिरावळ देवीचा डाळाप उत्सव

प्रकाशन: 12 Dec 2021 11:28 AM
वाचन संख्या 60

जगप्रसिद्ध सैतवडे धबधब्याजवळील आहे हे जागृत देवस्थान….

शिरगांव/संतोष साळसकर :सुमारे ४०० वर्षाची परंपरा लाभलेल्या देवगड तालुक्यातील शिरगांव-पाडागरवाडी येथील जागृत श्री गिरावळदेवीचा वार्षिक डाळाप उत्सव आज रवि. १२ डिसें. रोजी पारंपरिक रीतिरिवाजानुसार आणि कोरोनाचे सर्व नियम पाळून साजरा होणार आहे.देशी-विदेशी पर्यटकांचे खास आकर्षण असलेल्या, निसर्गसौंदर्याने पुरेपूर नटलेल्या , बारमाही वाहणाऱ्या जगप्रसिध्द पाडागर येथील सैतवडे धबधब्यापासून सुमारे ५० फूट अंतररावरील वरच्या बाजुला शिवगंगा पियाळी नदीच्या पात्रात हे जागृत श्री गिरावळ देवीचा चौथरा आहे.जवळच नदीपात्रातील डोहात देवीची ३ पाषाणे आहेत.पावसाळा संपला की मार्गशीर्ष महिन्यात ही पाषाणे बाहेर काढून चौथऱ्यावर विराजमान केली जातात.नंतर ती पावसाळा सुरू होण्यापूर्वी पुन्हा नदीपात्रात ठेवली जातात.डाळाप उत्सवासाठी शिरगाव गावातील बारा वाड्यातून शिधा गोळा करण्याची प्रथा असून त्याचा वापर महाप्रसादासाठी केला जातो.या देवीबद्दल आख्यायिका अशीही आख्यायिका सांगितली जाते की पाडागर येथून वाहणाऱ्या शिवगंगा पियाळी नदीच्या पलीकडच्या तीरावर ताम्हाणे गाव आहे.या गांवाची श्री भराडी देवी ही श्री गिरावळ देवीची बहीण आहे.पावसाळ्यात दुपारच्या वेळी श्री गिरावळ देवी आपल्या बहिणीसाठी जेवण घेऊन नदीपात्र ओलांडत असताना नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे या पाण्यात श्री गिरावळ देवी वाहत जाऊन एका डोहात स्थिरावली. पाडागर येथील कुंभार समाजातील गोठणकर घराण्यातील पूर्वजांना देवीने स्वप्नात येऊन दृष्टांत दिला नदीपात्रातील डोहात ३ पाषाणे सापडली.ही पाषाणे पाळण्यात घालून नदीपात्रातून बाहेर काढून त्यांची विधिवत पूजा-अर्चा करण्यात आली.या डाळाप उत्सवाला सुमारे ४०० वर्षाची परंपरा असल्याचे येथील वयोवृद्ध जाणकार सांगतात.यादिवशी सकाळी श्री गिरावळ देवीची पूजा-अर्चा,ओटी भरणे,नवस बोलणे,नवस फेडणे,दुपारी महाप्रसाद आदि धार्मिक कार्यक्रम पार पाडतात.यावेळी ग्रामस्थांसह बहुसंख्येने भाविक श्रध्येने उपस्थित राहतात.

Article image

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स