ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
पैसा पैसा...!(सिनेपट)

पैसा पैसा...!(सिनेपट)

प्रकाशन: 12 Dec 2021 11:18 AM
वाचन संख्या 96

पैसा पैसा (मराठी सिनेमा)

समीक्षण

अजय एक तिशीचा प्रसन्न वाटेल असा तरुण. सिनेसृष्टीतील दिग्दर्शक वजा एक होतकरु कॅमेरामन अशी त्याची ओळख…..! काही कारणास्तव ती ओळख आता बहुतांश कोणीच आपली ओळख ठेवू इच्छित नसते आणि त्यासोबत अपयशी असा शिक्का बसायच्या अदृश्य शक्तीही आपसूक कार्यरत होत असतात.
पण अजय फार सकारात्मक आशावादी वगैरे नसला तरी प्रामाणिक असतो.
अजयला सकाळी जाग येते.आळोखे पिळोख्यांसोबतच एक फोन येतो.
खरेतर तो फोन सुखद असतो. त्याचे जवळपास संपुष्टात येत चाललेले वैवाहिक जीवन पुन्हा जुळवाजुळव करायचा प्रयत्न करुन भेटण्यासाठी त्याच्या पत्नीचाच तो फोन असतो.
एका सिगरेटसोबत स्वतःला ताजेतवाने करत करत तो तिच्या भेटीची तयारी करु लागतो.
खिशात दोन हजार इतकी भरगच्च रक्कम आणि खरेतर तेवढाच त्याचा बॅन्क बॅलन्स असतो.परंतु त्यांसमोर आज पत्नीशी पुनर्मिलनाची शक्यता ही अमूल्य असल्याने तो इतर विचार न करता त्याच्या बुलेटला किक मारतो….
इथेच “पैसा पैसा” नावाचा सिनेमा सुरु होतो.
जरुर पहा…अभिनेता सचित पाटील हा अभिनेता का आहे ते समजण्यास झेंडा किंवा क्षणभर विश्रांती जितके सक्षम सिनेमा आहेत त्यापलीकडे जात तो आंतरराष्ट्रीय अभिनेता का आहे नक्कीच कळेल.
2016 साली आलेला हा सिनेमा एमॅझाॅन प्राईमवर उपलब्ध आहे.
नेमका किती पैसा…हा पैसा असतो ते दाखवायच्या दिग्दर्शकाच्या कसबाला सचितने नेमके “किती पैसे फिटवलेत” ते प्रेक्षक म्हणून समजेलच आणि माणूस म्हणून…….

सुयोग पंडित (मुख्य संपादक/आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल)

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स