ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मसुरेत अनधिकृत वाळू वाहतुकीच्या डंपरवर कारवाई!

मसुरेत अनधिकृत वाळू वाहतुकीच्या डंपरवर कारवाई!

प्रकाशन: 11 Dec 2021 11:55 PM
वाचन संख्या 83

मालवण | प्रतिनिधी : मसुरे स्टेट बँक समोरील रस्त्यावर अनधिकृत वाळूने भरलेला डंपर (एम एच ०७ सी ६२६६) पकडून पुढील कार्यवाही साठी मालवण तहसीलदार कार्यालय येथे जमा केल्याची माहिती मसुरे मंडळ अधिकारी एस. आर.चव्हाण यांनी दिली. शनिवारी दुपारी १२.३० च्या दरम्याने सदर डंपर मधून अनधिकृत वाळू वाहतूक होत असल्याचे मंडळ अधिकारी श्री. चव्हाण यांच्या निदर्शनास आले. चालकाकडे अधिकृत पास नसल्याने सदर डंपरवर कारवाई करण्यात आली आहे. या वेळी मसुरे कोतवाल सचिन चव्हाण, मसुरे पोलीस श्री विवेक फरांदे यांचे सहकार्य लाभले. काही दिवसा पूर्वी मसुरे परिसरातील अनधिकृत रेती रॅम्प ही मंडळ अधिकारी श्री चव्हाण यांनी महसूल यंत्रणा आणि पोलिसांच्या साह्याने तोडले होते.या पुढेही या भागातून अनधिकृत रेती वाहतूक वर करडी नजर ठेवण्यात येणार असल्याचेही श्री चव्हाण यांनी सांगितले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स