ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
दिल दोस्ती दुनियादारी ग्रुप कणकवलीची क्रिकेट स्पर्धा ९ फेब्रुवारी पासून
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

दिल दोस्ती दुनियादारी ग्रुप कणकवलीची क्रिकेट स्पर्धा ९ फेब्रुवारी पासून

प्रकाशन: 11 Dec 2021 11:50 PM
वाचन संख्या 343

१ लाख प्रथम पारितोषिक असलेली जिल्ह्यातील पहिली क्रिकेट लीग

कणकवली / उमेश परब – बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित दिल दोस्ती दुनियादारी ग्रुप कणकवली आयोजित सुमारे सव्वा लाख रुपये प्रथम पारितोषिक असलेली कै बाळ पावसकर स्मृती चषक २०२२ ही क्रिकेट स्पर्धा क्रीडा रसिकांसाठी सज्ज झाली आहे. ९ फेब्रुवारी ते १३ फेब्रुवारी या दरम्यान ही स्पर्धा होणार असून ह्या वर्षी ही स्पर्धा लीग पद्धतीने खेळवीली जाणार असल्याची माहिती दिल दोस्ती दुनियादारी ग्रुप कणकवली यांच्या माध्यमातून प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. गत वर्षी झालेल्या क्रिकेट स्पर्धेत दिल दोस्ती दुनियादारी ग्रुपच्या वतीने २०२२ साली जिल्ह्यातील खेळाडूंना नावलौकिक देणारी मोठी स्पर्धा भरवू असे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार ९ फेब्रुवारी ते १३ फेब्रुवारी या दिवसात ही स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा लीग पद्धतीने होणार असून संघ मालकांनी राज्य किंवा राज्या बाहेरील कोणतेही दोन खेळाडू आयकॉन म्हणून घ्यावेत व इतर खेळाडू जिल्ह्यातीलच असावेत व लीग पद्धतीने खरेदी करावेत असा नियम या स्पर्धेदरम्यान ठेवण्यात आला आहे. या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक १ लाख २२ हजार २२२ व आकर्षक चषक तर द्वितीय पारितोषिक ६२ हजार २२२ व आकर्षक चषक, व इतर आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. या स्पर्धेत १६ संघ खेळविण्यात येणार आहेत. इच्छुक संघ मालकांनी ३१ डिसेंबर पर्यंत आपली नाव नोंदणी करण्यासाठी राकेश पावसकर – ९८५०१०२६७८ व धैर्यशील रावराणे – ९८९०८८८५९० यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन दिल दोस्ती दुनियादारी ग्रुप कणकवली यांच्या वतीने करण्यात आले आहे. जिल्ह्यातील खेळाडूंना या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी लागणारे फॉर्म ऑनलाइन उपलब्ध असणार आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स