ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
पराभव समोर असल्याने निवडणुका पुढे ढकलण्याचे काम केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचा राज्य सरकारवर आरोप
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

पराभव समोर असल्याने निवडणुका पुढे ढकलण्याचे काम केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचा राज्य सरकारवर आरोप

प्रकाशन: 11 Dec 2021 08:31 PM
वाचन संख्या 48

कणकवली / उमेश परब – राज्यात असलेल्या तीन पक्षाला कुठलीच निवडणूक नको आहे. कारण लोक त्यांच्या पाठीमागे नसल्याने त्यांना निवडून देणार नाहीत. त्यामुळे राज्य सरकार आजचे मरण उद्यावर ढकलत निवडणुका पुढे ढकलत असल्याचा आरोप केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी शनिवारी सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.पडवे येथील हॉस्पिटलच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री राणे बोलत होते. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, डॉ. मिलिंद कुलकर्णी उपस्थित होते.पुढे बोलताना राणे यांनी, राज्यात अनेक विषय आहेत. केंद्रातील अनेक विषय मी हाताळत आहे. अधिवेशनाला दोन आठवडे झाले आहेत. अधिवेशन सुरळीत चालू आहे. कायदे करणारी बिले मंजूर होत आहेत. लष्कराच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला ही दुर्दैवी घटना घडली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भारत आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने काम करत आहेत. देशाच्या समस्या अडचणी मोदी सरकार सोडवीत आहेत. असेही ते म्हणाले

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स