ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
व्हेल माश्याच्या उलटीची तस्करी करताना गोव्यातील तीन संशयीत कोट्यवधीच्या मुद्देमालसह ताब्यात
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

व्हेल माश्याच्या उलटीची तस्करी करताना गोव्यातील तीन संशयीत कोट्यवधीच्या मुद्देमालसह ताब्यात

प्रकाशन: 11 Dec 2021 08:26 PM
वाचन संख्या 75

स्थानिक गुन्हा अन्वेषण सिंधुदुर्ग विभागाच्या पथकाने बांदा येथे येत केली या तस्करीची कारवाई

बांदा/प्रतिनिधी : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी असलेली व कोट्यावधी रुपये किंमत असलेली व्हेल माश्याची उलटी स्थानिक गुन्हा अन्वेषण सिंधुदुर्ग विभागाच्या पथकाने सापळा रचून बांदा बाजारपेठ येथे गोवा येथून आलेल्या तीन संशयिताना पकडले. यामध्ये पाच कोटी बावीस लाख कींमतीच्या मुद्देमालासह तीन संशयीत आरोपींना ताब्यात घेण्यात आले. संशयीत काँन्टनटिनो फीलोमीनो फर्नाडिस, शालशेत मडगाव गोवा, जुजु जोस फेरीस, शालशेत मडगाव गोवा, तनिष उदय राऊत, वय १८ लंगरबाग, तोर्से पेडणे गोवा असे त्यांचे नाव आहे. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास मिळालेल्या गुप्त माहीतीवरून आज स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने बांद्यात येथे सापळा रचला होता. त्याप्रमाणे संशयीत मुद्देमाल घेऊन बांदा बाजारपेठेत आपल्या ताब्यातील स्विफ्ट कार घेऊन आले असता स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने त्यांना मुद्देमालसह ताब्यात घेतले.

Article image

संरक्षित प्राणी, व्हेल माशाची उलटी (अंबरग्रीस) या बेकायदेशीर व्यापार करणाऱ्या इसमांचा सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून पर्दाफाश करण्यात आला. व सदर कारवाई करण्यात आली. व्हेल माशाची उलटी म्हणजे समुद्रातील तरंगते सोने असे मानले जाते. सदरचा पदार्थ हा स्पर्म व्हेल माशाच्या पोटात तयार होतो. नमुद पदार्थाचा वापर हा अति उच्च प्रतिचा परफयुम, औषधांमध्ये तर काही ठिकाणी सिगारेट, मद्य, तसेच खादय पदार्थामध्ये स्वाद वाढविण्याकरीता देखील केला जातो. सदरचा पदार्थाची खरेदी विक्री करणे हे वन्य प्राणी सुरक्षा अधिनियमांतर्गत बेकायदेशीर आहे. नमुद पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये करोडो रुपयांमध्ये किंमत आहे.

सदर बांदा या ठिकाणी तीन संशयित वन्य संरक्षीत प्राणी व्हेल माशाचे उलटीची ज्याचे खरेदी विक्रीवर शासनाने बंदी आणलेली आहे ती वस्तु बेकायदेशीररित्या विकण्याकरीता बांदा परीसरात येणार असल्याची माहीती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला गुप्त पद्धतीने मिळाली होती. मिळालेल्या वरील बातमीची खातरजमा करण्यात आली. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तसा बांदा गांधी चौक बाजारपेठेत येथे सापळा रचला व गोव्यातील तीन संशयित त्यांच्या ताब्यातील स्वीप्ट कार व मोटर सायकल सह संशयित ताब्यात घेतले. सदर संशयित एका पिशवीमधुन ५ किलो २३२ ग्रॅम वजनाची व्हेल माशाची उलटी ज्याची किंमत साधारणत: ५,३२,२०००० रुपये (५ कोटी ३२ लाख २० हजार रुपये) आहे. ही उलटी जप्त करण्यात आली आहे. सदर कारवाईप्रमाणे तिन्ही संशयित आरोपीनां ताब्यात घेत वन्य प्राणी संरक्षण कायदा १९७२ चे कलम ३९, ४४, ४८, ४९ (ब) ५१, ५७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे.

Article image

सदरची कारवाई ही मा श्री. पोलीस अधिक्षक, राजेद्र दाभाडे सिंधुदुर्ग, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री नितीन बगाटे, सिंधुदुर्ग यांचे मार्गदर्शनाखाली श्री वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल धनावडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग यांचे सुचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखचे सपोनि महेंद्र घाग, पोउनि सचिन शेळके, पोहेकॉ/ अनिल धुरी, आशिष गंगावणे, प्रकाश कदम, अनुपकुमार खंडे, प्रवीण वालावलकर, पोना/ चंद्रकांत पालकर, पोकॉ/ ज्ञानेश्वर कांदळगांवकर, प्रथमेश गावडे यांनी केलेली आहे. वनविभागातील मा. उपवनसंरक्षक शहाजी नारनवर, वनरक्षक डी.बी.शिंदेवनक्षेत्रपाल सावंतवाडी मदन शिरसागर , वनपाल अनिल मेस्त्री, प्रमोद राणे, शशिकांत देसाई, प्रविण पाटील.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स