नांदगाव येथे सुरेश प्रभु यांच्या माध्यमातून 10 शिलाई मशिन वाटप
विविध प्रशिक्षण प्रमाणपत्र वितरण संपन्न
कणकवली / उमेश परब – माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या व विमान प्राधिकरण यांच्या वतीन व नांदगाव येथील किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट नांदगाव च्या सहकार्याने नांदगाव येथील 10 महीलांना मोफत शिलाई मशिन वाटप करण्यात आले . सदर महीलांनी एकत्र व्यवसाय करून आपला व्यवासाय निर्माण करायचा आहे .तसेच यावेळी जनशिक्षण संस्थान सिंधुदूर्ग तर्फे नांदगाव येथे अगरबत्ती,शिवणकला ,फळ प्रक्रीया आदी प्रमाणपत्र वितरण करण्यात आले .तसेच केंद्र सरकार मान्यता प्राप्त CSC नागरीक सुविधा केंद्र या कॉमन सर्व्हीस सेंटर चे उद्घाटन यावेळी करण्यात आले .
यावेळी नांदगाव सरपंच आफ्रोजा नावलेकर ,असलदे सरपंच पंढरी वायंगणकर ,जनशिक्षण कार्यक्रम अधिकारी रमेश खरात ,राजन मोरजकर ,ऋषिकेश मोरजकर ,भाई मोरजकर ,दिपक मोरजकर ,ग्रामपंचायत सदस्या सौ.ईशा बिडये , सौ.वृषाली मोरजकर ,सौ.रश्मी मोरजकर ,मयुरी मोरये ,आदी महीला वर्ग बहुसंख्येने उपस्थीत होता. यावेळी सरपंच आफ्रोजा नावलेकर यांनी माजी मंत्री सुरेश प्रभु व नांदगाव येथे किशोर मोरजकर ट्रस्ट या परिवर्तन केंद्राचे कौतूक करून सदर महीलांनी योग्य प्रकारे व्यवासाय उभारून मोठे उद्यासेजक बना असे आवाहन उपस्थीत महीलांना केले.तसेच जनशिक्षण चे रमेश खरात यांनी ही उपस्थीतांना मार्गदर्शन करीत विविध प्रशिक्षण व शिलाई मशिन संदर्भात मार्गदर्शन केले . यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालनइ ऋषिकेश मोरजकर व आभार भाई मोरजकर यांनी मानले .
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)