ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
कोरोनाचा फटका बसला तरी  दशावतार कलेने पुन्हा उभारी घेतली - आ.  वैभव नाईक
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

कोरोनाचा फटका बसला तरी दशावतार कलेने पुन्हा उभारी घेतली - आ. वैभव नाईक

प्रकाशन: 11 Dec 2021 04:08 PM
वाचन संख्या 34

अखिल दशावतारी पारंपारिक लोककला अकादमी सिंधुदुर्गचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात

कणकवली / उमेश परब – अखिल दशावतारी पारंपारिक लोककला अकादमी सिंधुदुर्ग या संस्थेचा प्रथम वर्धापन दिन गुरुवारी पदमश्री पुरस्कार विजेते श्री. परशुराम गंगावणे यांच्या विश्राम पपेट थिएटर येथे उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक, संजय पडते, काका कुडाळकर, सतीश लळीत, यशवंत तेंडोलकर, गजा बांबुळकर, तुषार नाईक, दत्तप्रसाद शेणई, दादा राणे-कोनस्कर, आबा जोशी, राजा सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत व पदमश्री परशुराम गंगावणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

Article image

यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले, अकादमीने गेल्या वर्षभरात अत्यंत चांगले काम केले आहे. दशावतारी कला आपल्या कोकणची ओळख आहे. या कलेला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. कोरोनाचा फटका बसला असताना देखील दशावतार कलेने पुन्हा उभारी घेतली आहे. राज्य सरकार कडून कलाकारांसाठी पेंशन योजना सुरु आहे.अनेक कलाकारांना याचा लाभ मिळत आहे. तसेच अन्य योजनांचा लाभ कलाकारांना मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. अकादमीच्या माध्यमातून देखील कलाकारांच्या अडचणी सोडविण्याचे काम झाले पाहिजे यासाठी लागणारे सर्वोतपरी सहकार्य केले जाईल असे आ. वैभव नाईक यांनी आश्वासित केले.

दशावतार कलेची पार्श्वभूमी, दशावतारात काळानुसार होत गेलेला बदल, सादरीकरणाचे नियोज़न संस्कृती संवर्धानाबाबत नवीन कलाकारांची जबाबदारी या विषयावर दयानंद तुळपुळे, आपा दळवी, आबा जोशी, यशवंत तेंडोलकर यांनी मार्गदर्शन केले. दरम्यान अतुल बंगे, अमरसेन सावंत, राजू कविटकर, आनंद कुंभार, बाळू पालव, आबा खवणेकर, सुधाकर वळंजू, मंजुनाथ फडके, सौरभ पाटकर यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी गणेश भवानी दशावतार नाट्य मंडळाचा महान पौराणिक नाट्य प्रयोग सादर करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अकादमीचे अध्यक्ष बाळकृष्ण गोरे, समीर तोंडोलकर, श्री. तांबे,दयानंद तुळपुळे व अकादमीचे सर्व सदस्य यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजा सामंत यांनी केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स