सिद्धिविनायक सावंतवाडी संघ -उपसरपंच चषक २०२१ चा मानकरी ठरला.
उपविजेता पद सरफरे मित्रमंडळ संघाने पटकावले
शिरगाव/ संतोष साळसकर : प्रथमच देवगड तालुक्यातील शिरगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या शिरगाव प्रीमियर लीग मधील अंतिम लढतीत सिद्धिविनायक सावंतवाडी संघाने बाजी मारत उपसरपंच चषक पटकावले. शिरगाव बाजारपेठ येथील ओमगणेश क्रीडांगणावर पार पडलेल्या एस.व्ही.स्पोर्ट, अमित साटम मित्रमंडळ व सोनू मोंडकर मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शिरगाव प्रीमियर लीग उपसरपंच चषक २०२१ या प्रकाश झोतातील बॉक्सटाईप मर्यादित षटकांच्या क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामना सिद्धिविनायक सावंतवाडी आणि सरफरे मित्रमंडळ या संघात झाला.सिद्धिविनायक सावंतवाडी संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले.प्रथम फलंदाजी करताना सरफरे मित्रमंडळ संघाने मर्यादित षटकात सर्वबाद ३५ केल्या.प्रत्युत्तरादाखल आव्हानाचा पाठलाग करताना शेवटच्या चेंडूपर्यंत रोमहर्षक स्थितीत कडवी झुंज देत सिद्धिविनायक सावंतवाडी संघाने विजय मिळविला.अंतिम विजेत्या सिद्धिविनायक सावंतवाडी संघाला १०,००० रुपये व चषक व उपविजेत्या सरफरे मित्रमंडळ संघाला ५,००० रुपये व चषक,तृतीय एस.बी.स्पोर्ट देवगड संघाला ३,०००रुपये व चषक,चतुरर्थ स्वामी समर्थ आंबेखोल संघाला २,००० रुपये व चषक वैयक्तिक परितोषिकात उत्कृष्ट क्षेत्रररक्षक आकाश साटम,गोलंदाज गुरुप्रसाद मलये, मालिकाविर भूषण गावडे, यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.यावेळी शिरगाव हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य विजयकुमार कदम,उपसरपंच अमित साटम,माजी सभापती सदानंद देसाई, सामाजिक कार्यकर्ते संदीप साटम,हेमंत देसाई, भाई आईर, शरद साटम,विशाल साटम, गणेश पवार, युधिराज राणे, विवेक चव्हाण, मंगेश लोके,सर्वोत्तम साटम,विशाल कुवळेकर आदींसह क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)