ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा व्याख्यानमालेचे १८ ते २४ डिसेंबर कालावधीत रत्नागिरी,सिंधुदुर्ग जिल्हात आयोजन!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा व्याख्यानमालेचे १८ ते २४ डिसेंबर कालावधीत रत्नागिरी,सिंधुदुर्ग जिल्हात आयोजन!

प्रकाशन: 09 Dec 2021 01:58 PM
वाचन संख्या 41

तिमिरातुनी तेजाकडे संस्थेचा उपक्रम

मसुरे /प्राजक्ता पेडणेकर: सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भूमिपूत्र व मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार विभागात कनिष्ठ अनुवाद अधिकारी पदावर कार्यरत असणारे श्री. सत्यवान यशवंत रेडकर रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी १८-२४ डिसेंबर २०२१ च्या दरम्यान खाली नमूद केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा व्याख्यानमाला घेणार आहेत. सदर व्याख्यानांसाठी कोणतेही रजिस्ट्रेशन शुल्क, कोणतेही मानधन घेतले जाणार नाही आहे. *रत्नागिरी*- शनिवार, दिनांक १८.१२.२०२१.*आर.बी.शिर्के हायस्कूल*, माळनाका, रत्नागिरी (सकाळीः ९.०० वाजता).*सौ. गोदुताई जांभेकर विद्यालय*, एस.टी स्टॅड समोर, रत्नागिरी (दुपारीः २.०० वाजता).*राजापूर तालुका*- रविवार, दिनांक १९.१२.२०२१. *वि.सी गुर्जर विद्यामंदिर व ज्युनि.कॉलेज ऑफ आर्टस एण्ड कॉमर्स*, कशेळी, (सकाळीः ९.०० वाजता).*श्री. महाकाली इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय*, आडिवरे (दुपारीः १.०० वाजता). सोमवार, दिनांक २०.१२.२०२१, *युवक विकास मंडळ संचालित कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय*, भालावली, (सकाळीः ९.०० वाजता).*नाटे नगर विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय*, नाटे (दुपारीः १.०० वाजता).मंगळवार, दिनांक २१.१२.२०२१, *न्यू इंग्लिश स्कूल व श्रीमती स्नेहलता रामचंद्र मांजरेकर कनिष्ठ महाविद्यालय*, जैतापूर, (सकाळीः ९.०० वाजता).*साने गुरूजी विद्यामंदिर आणि प्रकाश भिकाजीराव चव्हाण आर्टस् व कॉमर्स (संयुक्त) कनिष्ठ महाविद्यालय*, जानशी (दुपारीः १.०० वाजता).*सिंधुदुर्ग* बुधवार, दिनांक २२.१२.२०२१, *शेठ म.ग. हायस्कूल देवगड* (सकाळीः ८.०० वाजता).*पूर्ण प्राथमिक शाळा*, सावडाव नं. १, कणकवली (दुपारीः १२.०० वाजता). गुरूवार, दिनांक २३.१२.२०२१, *आंबोली पब्लिक स्कूल* (सकाळीः ९.०० वाजता).*श्री. शिवछत्रपती माध्यमिक विद्यालय*, असनिये (दुपारीः १.०० वाजता). शुक्रवार, दिनांक २४.१२.२०२१, *महात्मा गांधी विद्यामंदिर हायस्कूल*, सातार्डा (सकाळीः ९.०० वाजता).*बांदा ग्रामपंचायत सभागृह*, खेमराज मेमोरियल इंग्लिश शाळेच्या बाजुला (दुपारीः १.०० वाजता).“शासकीय कर्मचा-यांचे गाव” घडविण्यासाठी ही शैक्षणिक चळवळ आहे, जास्तीत जास्त रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी या निःशुल्क मार्गदर्शन व्याख्यानांचा लाभ घ्यावा असे आवाहन तिमिरातुनी तेजाकडे या नोंदणीकृत सामाजिक संस्थेचे अध्यक्ष, श्री. सचिन यशवंत रेडकर (मो. ९७६८७३८५५४ / ९९६९६५७८२०) यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स