ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
श्री बांदेश्वर मंदिराचा दिपोत्सव उत्साहात.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

श्री बांदेश्वर मंदिराचा दिपोत्सव उत्साहात.

प्रकाशन: 09 Dec 2021 03:45 PM
वाचन संख्या 29

बांदा /राकेश परब : बांदा येथिल श्री बांदेश्वर भुमिका देवस्थानचा दिपोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा झाला.प्रतिवर्षी देवदीपावलीलाहा दिपोत्सव साजरा केला जातो. या सोहळ्यात भाविकांना मोठ्या संख्येने सहभाग घेतला. श्री बांदेश्वर भुमिका मंदिर परिसर या हजारो दिव्यांच्या प्रकाशाने उजळून गेला होता. रविवार देवदीपावलीच्या दिवशी सायंकाळी या दिपोत्सवाचे उद् घाटन मंदिरातील पुराण वाचन कार्यक्रमाचे नियमित सदस्य चंद्रकांत मोर्ये ,श्री बांदेश्वराचे सेवेकरी भक्त तथा बांदा येथिल व्यापारी विवेक विरनोडकर , श्री बांदेश्वर भुमिका देवस्थान समितीचे सेक्रेटरी सावळाराम सावंत आदींच्या हस्ते दिपप्रज्वलनाने झाले. यावेळी देवस्थान समिती अध्यक्ष सुभाष मोर्ये , जि.प.सदस्य श्वेता कोरगांवकर , सगुण सावंत , लक्ष्मी सावंत, सुरेश सावंत,धोंडू पणशीकर ,मोहन सावंत , शरद सावंत ,प्रकाश प्रभु यांचेसह अनेक मान्यवर , महिलावर्गासह श्री बांदेश्वर भक्त भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष सुभाष मोर्ये यांनी केले. देवस्थानतर्फे दिव्यांची व्यवस्था करण्यात आली होती. त्यासाठी एका दिव्यासाठी अकरा रुपये अर्पणमुल्य ठेवण्यात आले होते.श्री बांदेश्वर भक्त सेवेकरी महिलांनी प्रतिवर्षाप्रमाणे भाविकांना दिवे भरुन देण्याच्या कामाचे उत्तम नियोजन केले.मंदिर परिसरात सुंदर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून दिवे पेटवून या सोहळ्यात सहभाग घेतला.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स