ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवीन  १५ उपअभियंत्यांची नियुक्तीना.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवीन १५ उपअभियंत्यांची नियुक्तीना.

प्रकाशन: 06 Dec 2021 08:26 PM
वाचन संख्या 69

प्रतिनिधी/ विवेक परब:उदय सामंत, खा.विनायक राऊत,आ.दीपक केसरकर,आ.वैभव नाईक यांचा पाठपुरावा

परबपालकमंत्री ना. उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध विभागातील रिक्त असलेली उपअभियंता पदे भरण्यात आली आहेत.सिंधुदुर्ग मधील सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, पतन विभाग, मार्गप्रकल्प विभाग या विभागांमध्ये एकूण १५ अभियंत्यांना उपअभियंता म्हणून नवनियुक्ती देण्यात आली आहे. या नियुक्त्या झाल्याने विकास कामांची कार्यवाही गतिमान पद्धतीने होण्यास मदत होणार आहे. यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग कुडाळसाठी राजन वामन चव्हाण, सावंतवाडीसाठी सिमा यशवंत गोवेकर, वेंगुर्लेसाठी शंशाक भगत, दोडामार्गसाठी अनिल बडे, वैभववाडीसाठी विनायक जोशी, कणकवलीसाठी गणेश कर्वे, देवगडसाठी श्रीनिवास बासुतकर, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग मध्ये कुडाळसाठी राजेंद्र कुलांगे, मालवणसाठी संतोष सावर्डेकर, ओरोससाठी धनंजय ठाकरे, देवगडसाठी नरेंद पं. महाले, पतन विभागात कुडाळ (ओरास) साठी महादेव चव्हाण, देवगड (वाघोटन)साठी प्रशांत पवार, तर मार्गप्रकल्प विभागात कणकवलीसाठी विनोद दिवटे, कुडाळसाठी राजेश चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स