ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
नेहरू युवा केंद्र आयोजित देवगड तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न : जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

नेहरू युवा केंद्र आयोजित देवगड तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न : जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

प्रकाशन: 06 Dec 2021 04:49 PM
वाचन संख्या 40

कणकवली / उमेश परब – नेहरू युवा केंद्र संघटन सिंधुदुर्गच्यावतीने अखिल भारतीय वक्तृत्व स्पर्धेसाठी तालुकास्तरीय वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी देवगड तालुक्यातून तीन स्पर्धकांची निवड करण्यात आली. केंद्रशासनाच्या नेहरू युवा केंद्र संघटन मार्फत देशभरात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा तालुकास्तरापासून देशपातळीवर घेण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा युवा अधिकारी श्री. मोहित सैनी तसेच प्रकल्प सहाय्यक सौ. अपेक्षा मांजरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदूर्ग जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून ही स्पर्धा घेण्यात येत आहे. यामध्ये देवगड तालुक्यातील निवड चाचणी पार पडली. यामध्ये दीप्ती वारीक (मुटाट) – प्रथम,  कु. सुरभी ओगले (दहिबाव) द्वितीय,  यशोधन देवधर (विजयदुर्ग) तृतीय या स्पर्धकांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. युवकांनी राष्ट्र निर्मितीमध्ये खारीचा वाटा उचलावा या उद्देशाने नेहरू युवा केंद्र  युवकांसाठी विविध उपक्रम राबवते. चांगल्या नागरिकत्वाची मूल्ये विकसित करणे हा मुख्य उद्देश. ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचे आपण देणे लागतो. म्हणजेच सामाजिक बांधिलकी युवकांमध्ये रुजविण्यासाठी राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रनिर्माण या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. तालुक्यातील १८ ते २९ वर्ष वयोगटातील युवक युवतींनी स्पर्धेमध्ये सहभाग घेतला.तालुका ते देशपातळीवर जाणारी ही स्पर्धा हिंदी किंवा इंग्रजी भाषेतून अनिवार्य होती. मातृभाषेच्या पलीकडे जाऊन परप्रांतीय हिंदी आणि इंग्रजी भाषेतील स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन ग्रामीण भागातील स्पर्धकांनी आव्हान स्विकारल्याबद्दल आयोजकांकडून सर्वच स्पर्धकांचे कौतुक होत आहे. असेच सातत्याने नवीन आव्हानांना स्विकारत स्वतः क्रियाशील राहावे आणि राष्ट्र निर्मितीसाठी NYKS च्या उपक्रमांमध्ये खारीचा वाटा उचलावा असे आवाहन देवगड तालुका समन्वयक रीना दुदवडकर यांनी युवकांना केले.या स्पर्धेसाठी डॉ. वाय्. व्ही. महालिंगे (कणकवली), प्रा. राजेंद्र पवार (फणसगाव), श्री. व्ही. डी. टाकळे (तळेरे) यांनी परीक्षणाचे काम पाहिले. या कार्यक्रमास उपस्थित प्रा. नरेश शेट्ये, तंबाखू प्रतिबंध अभियान तळेरे सौ. श्रावणी मदभावे तसेच स्पर्धक, परीक्षक आणि प्रेक्षक वर्ग उपस्थित होते. देवगड तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये फणसगाव महाविद्यालय, विजयालक्ष्मी दळवी महाविद्यालय, श्रावणी कंप्युटर एज्युकेशन, महाविद्यालय कणकवली, पंचम खेमराज लॉ कॉलेज, पोतदार स्कूल या शैक्षणिक संस्थांमधून विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ही स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. सर्व स्पर्धकांना ई- प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.या दरम्यान डॉ. महालिंगे यांनी स्पर्धकांना मार्गदर्शन करत NYKS च्या कार्यक्रमांस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेहरू युवा केंद्र संघटन, देवगड तालुका समन्वयक सुजय जाधव यांनी तर रीना दुदवडकर यांनी प्रास्ताविकासह आभार  मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स