ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
भाजपा - वेंगुर्ले च्या वतीने डाॅ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमीत्त अभिवादन

भाजपा - वेंगुर्ले च्या वतीने डाॅ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमीत्त अभिवादन

प्रकाशन: 06 Dec 2021 05:01 PM
वाचन संख्या 35

ब्यूरो न्यूज /विवेक परब: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव , भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनी वेंगुर्ले शहरातील आनंदवाडी येथील समाज मंदिरात डाॅ. बाबासाहेबांच्या प्रतीमेस नगराध्यक्ष राजन गिरप व जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून तसेच मेणबत्ती प्रज्वलीत करुन त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यात आले . यावेळी आदरांजली वाहताना नगराध्यक्ष राजन गिरप म्हणाले की , विषम समाज व्यवस्थेचे चटके सोसत तमाम वंचीतांना मायेची सावली देऊन , धरतीवरील क्रांतीसुर्य अस्तास गेला . परंतु जाण्यापूर्वी त्यांनी सकल मानव जातीला त्यांचे नैसर्गिक हक्क , न्याय , समान अधिकार बहाल केले . संपूर्ण जगात कुठल्याही देशात नसेल असे महान संविधान अर्पण करुन , बलाढ्य अशी लोकशाही बहाल केली ते म्हणजे विश्वरत्न , परमपुज्य , बोधीसत्व , भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार , भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर . अशा महामानवास त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी कोटी कोटी प्रणाम . यावेळी तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , उपनगराध्यक्षा कु शितल आंगचेकर , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर , ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नांडिस , किसान मोर्चा जि.सरचिटणीस बाळु प्रभु , माजी: उपनगराध्यक्ष गिरगोल फर्नांडिस तसेच आनंदवाडी मधील समाज बांधव उपस्थित होते .

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स